Opinion poll : निवडणूक आयोगाने शिवसेनेची ओळख असलेले धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले आहे. सोबतच दोन्ही गटांना शिवसेना नावाचा वापर करण्यावर सुद्धा बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे शिंदे गटाचा विजय झाला असे मानण्यात येत आहे.
परंतु निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचा दोन्ही गटावर काय परिणाम होईल यांची शक्यता राजकीय जाणकार वर्तवत आहेत. तर माध्यमात सुद्धा तीच चर्चा सुरु आहे.
तर सोशल मिडीयावर सामन्य जनता ही आपलं मत मांडत आहे. अशातच महाराष्ट्र टाईम्सने ट्विटरवर एक सर्वे केला. या सर्वेचा उद्देश सामान्य जनतेचा मनात काय आहे हे पाहणे होता. महाराष्ट्र टाईम्सच्या सर्वे मध्ये ट्विटर वापरकर्त्यांना काही प्रश्न विचारण्यात आले होते.
या प्रश्नाच्या उत्तरासाठी दोन पर्याय देण्यात आले होते. यामध्ये हो किंवा नाही असे दोन पर्याय होते. ‘धनुष्यबाण चिन्ह गोठवाल्यामुळे उद्धव ठाकरे गटाला आगामी अंधेरी पूर्व निवडणुकीत फटका बसेल, असे वाटते का?’ असा प्रश्न ट्विटरवर महाराष्ट्र टाईम्सने विचारला होता.
त्यांच्या या सर्वेमध्ये ९२७ जणांनी सहभाग घेतला. त्याच्या या सर्वेमध्ये धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. महाराष्ट्र टाईम्सच्या या सर्वेमध्ये सहभाग घेतल्यापैकी ७६.५ टक्के लोकांना उद्धव ठाकरे यांना कोणतेही नुकसान होणार नाही असे म्हटले आहे. तर २३.५ टक्के लोकांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांना फटका बसेल असे मत व्यक्त केले आहे.
ही आकडेवारी शिंदे गटाला निराश करणारी आहे. पण या निवडणुकीत शिंदे गट आपला उमेदवार उभा करणार नाहीये. या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून ठाकरे गट निवडणूक लढवणार आहे. तर भाजपने देखील आपला उमेदवार जाहीर केला आहे.
महत्वाच्या बातम्या
Uddhav Thackeray : सर्वांसमोर धाय मोकलून उद्धव ठाकरे रडू लागले आणि म्हणाले की, बाळासाहेब धनुष्यबाण देव्हाऱ्यात…
politics : उद्धव ठाकरे आता थेट दिल्लीच्या तख्ताला देणार धडक; मातोश्रीवर ठरला ‘हा’ प्लॅन
Sharad pawar : ‘या’ निवडणूकीत पवारांनी अचानक भाजपच्या शेलारांसोबत केली युती, समीकरण बदलणार