Uddhav Thackeray : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी शिवसेना भवनात माजी नागसेवकांची बैठक घेतली. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही बैठक घेतली. तसेच येणाऱ्या निवडणुकांची जोरदार तयारी करा, असा सल्ला त्यांनी यावेळी माजी नगरसेवकांना दिला.
मुंबई महापालिका निवडणूका आपणच जिंकणार असा आत्मविश्वास त्यांनी या बैठकीमध्ये व्यक्त केला. आपल्या विभागात काम करा, वॉर्डमध्ये फिरा. लोकांमध्ये राहून काम करणे हा शिवसैनिकांचा गुणधर्म आहे. त्यामुळे लोकांच्या संपर्कात राहा, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
तसेच जे गेले त्यांची आपल्याला पर्वा नाही, शिवसैनिक आपल्यासोबत असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. यासोबतच जनतेची कामे करत राहा, सामाजिक बांधिलकी सोडू नका, असा सल्लादेखील उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत माजी नगरसेवकांना दिला आहे. सोबतच मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा एकदा भगवाच फडकेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
तसेच कुणाच्याही आमिषाला बळी पडू नका, असा सल्लादेखील उद्धव ठाकरेंनी नगसेवकांना दिला. २०१७ ची वॉर्ड रचना ठेवण्याचा आदेश आता एकनाथ शिंदे सरकारने दिला आहे. त्याला आपला विरोध असून त्यासाठी शिवसेना कोर्टात जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
नव्या वॉर्ड रचनेत पुन्हा आरक्षणे बदलण्याचीही शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेनेसाठी मुंबई महानगरपालिका खूप महत्वाची आहे. मुंबई महापालिकेचे बजेट हे भारतातील कोणत्याही महापालिकेपेक्षा जास्त आहे. उद्धव ठाकरे यांना मुंबई महानगरपालिकेवर आपली सत्ता टिकवून ठेवणे महत्वाचे आहे.
शिवसेनेतील बंडखोरीमुळे सध्या उद्धव ठाकरे राजकीयदृष्ट्या कमजोर झाले आहेत. भाजपला मुंबई महानगरपालिकेवर सत्ता स्थापन करण्याची ही चांगली संधी आहे. भाजपने शुक्रवारी मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी आशिष शेलार यांच्याकडे दिली आहे. यातून भाजपाने मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या
आशिष शेलार यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले, आता मुंबईचा महापौर हा भाजपचाच असणार
संजय राठोडांना राखी बांधा नाहीतर…; राठोड समर्थकांचा चित्रा वाघ यांना इशारा
लोकसभा निवडणुकीत भाजप- शिंदे युतीला बसणार धक्का? काय सांगतो सी- व्होटरचा सर्व्हे, पाहा आकडेवारी
बाळासाठी जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडर वापरणं टाळा, नाहीतर होऊ शकतो ‘हा’ भयानक आजार