एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेकडे सध्या केवळ १५ आमदार आहेत. दिवसेंदिवस शिंदे गटात सामील होणाऱ्या शिवसेना आमदारांची संख्या वाढत आहे. यादरम्यान सोमवारी शिवसेनेचे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर(Santosh Bangar) देखील शिंदे गटात सामील झाले आहेत.(Uddhav Thackeray calls shivsanik in hingoli)
यानंतर काल हिंगोलीमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला शिवसेनेचे हिंगोली जिल्हा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव देखील उपस्थित होते. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फोनवरून हिंगोलीमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
सगळे सोबत आहात ना रे बाबा, असा प्रश्न यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंगोलीमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना विचारला. शिवसेनेचे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर काल शिंदे गटात सामील झाले. आमदार संतोष बांगर शिंदे गटात सामील झाल्यानंतर शिवसेनेकडून पदाधिकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शिवसेनेचे हिंगोली जिल्हा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोन आला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना म्हणाले की, “सगळे सोबत आहेत ना रे बाबा. शिवसैनिकांनो मला चिंता नाही कोण आले, कोण गेले. तरीही मी लढणार.”
“तुम्हा सर्वांची साथ मला हवी आहे. मी पुन्हा नव्या दमाने शिवसेना उभी करणार. लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे”, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बहुमत चाचणीत यशस्वी झाले आहेत. बहुमत चाचणी पार पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी उद्धव ठाकरेंची शिवसेना खरी की तुमची शिवसेना खरी असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला. त्यावेळी उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “कोणी कितीही दावा केला तरी खरी शिवसेना आमचीच आहे. आमच्याकडे सध्या निम्म्यापेक्षा जास्त आमदार आहेत आणि अजूनही आमदार आमच्याकडे येत आहेत”, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
शिंदे गटाची आदित्य ठाकरेंवर मेहेरबानी; अपात्रतेसाठीच्या यादीतून आदित्य ठाकरेंना वगळलं
मी शरद पवारांना नव्हे, पण ‘या’ दोन नेत्यांना घाबरतो; शहाजी बापूंनी केला खुलासा, वाचा काय म्हणाले?
अजितदादा विरोधी पक्षनेते होताच फडणवीसांनी केले मोठे विधान, राष्ट्रवादीच्या पोटात आला गोळा