जव्हारलाही धावपट्टी उभारू, मग हवी तेवढी विमाने उडवा; मुख्यमंत्र्यांनी लगावला राज्यपालांना टोला

 

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विमानप्रवासाची परवानगी मुख्यमंत्री कार्यालयाने नाकारली आहे. त्यामुळे राज्याचे राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापलेले दिसून येत आहे.

अशात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जव्हार दौऱ्याला गेले असताना, त्यांनी राज्यपालांना चांगलाच टोला लगावला आहे. आता जव्हारलाही धावपट्टी उभारू, मग हवी तेवढी विमाने उडवा, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांनी या दौऱ्यावर असताना पालघर जिल्ह्याच्या विकासकामांचा आढावा घेतला आहे. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही निशाणा साधला. बंद दाराआड झालेल्या चर्चेतील सर्व तपशील, मी उघड करतो,असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी अमित शहांवर निशाणा साधला होता.

दौऱ्यावर असताना मुख्यमंत्र्यांनी वेगवेगळ्या ठिकाणची पाहणी केली आहे, त्यात ढापरपाडा, जव्हारचे कुटीर रुग्णालय, जामसर प्राथमिक आरोग्य केंद्र, खरवंद येथील घरकुलाची पाहणी त्यांनी केली आहे, तसेच रुग्णांची विचारपूसदेखील त्यांनी यावेळी केली आहे.

त्याआधी मुख्यमंत्र्यांनी सकाळी जव्हार प्रांत कार्यालयात एक आढावा बैठक घेतली होती. त्यावेळी त्यांनी पिण्याच्या पाण्यावर, धरणांच्या उंची वाढवण्यावर, प्रकल्पांची दुरुस्ती, तसेच तिथल्या स्थानिक प्रश्नांवर चर्चा केली होती.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.