Uddhav Thackeray : शिवसेनेच्या चिन्हावरुन एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात वाद सुरु आहे. एकनाथ शिंदे आपण खरी शिवसेना असल्याचे सांगत आहे. आपल्याकडे आमदार, खासदार, नगरसेवकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे आपणच खरी शिवसेना आहोत असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
तसेच एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरही दावा केला होता. याबाबत निवडणूक आयोग निर्णय घेतला घेणार होते. त्यामुळे निवडणूक आयोगाने यासंदर्भात दोन्ही गटांना पुरावे देण्यास सांगितले होते. पण पुरावे देऊन देखील निवडणूक आयोगाने एक धक्कादायक निर्णय घेतला आहे.
निवडणूक आयोगाने शिवसेना या नावावर आणि चिन्हावर काही काळासाठी बंदी घातली आहे. निवडणूकीसाठी धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आलं आहे. ठाकरे गट आणि शिंदे गट या दोन्ही गटांसाठी हा मोठा धक्का आहे. पण हा निर्णय अंधेरीच्या पोटनिवडणूकीपूरताच असणार आहे. त्यानंतर पुन्हा यावर एक नवा निर्णय घेतला जाईल.
या निवडणूकीत उद्धव ठाकरेंना शिवसेना हे नाव वापरता येणार नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंसमोर एक नवं आव्हान उभं राहिलं आहे. ठाकरेंसाठी हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. आता निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
निवडणूक आयोगाच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंनी एक पोस्ट केली आहे. त्यांनी इंस्टाग्राम पोस्ट केली असून त्यामध्ये त्यांनी जिंकून दाखवणारच असे म्हटले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी एक फोटोही पोस्ट केला आहे. त्यामध्ये उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंसोबत दिसून येत आहे.
दरम्यान, धनुष्यबाणाचे चिन्ह न मिळाल्यामुळे शिंदे गटालाही मोठा धक्का बसला आहे. आम्ही बाळासाहेबांच्या शिवसेनेचे विचार पुढे नेत आहोत, असे शिंदे गटाचे नेते सातत्याने म्हणत होते. पण आता शिवसेना हा शब्द वापरण्यास बंदी आल्यामुळे शिंदे गटाचीही पंचाईत झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
Neelkanth Bhanu: डोक्याला दुखापत झाल्याने १ वर्ष अंथरूणाला खिळून राहिला, आता उभी केली १० कोटींची कंपनी
Alka Kubal : अलका कुबल यांच्या पायलट लेकीने पुन्हा घेतली उंच भरारी; मुलीला शुभेच्छा देत अलका म्हणाल्या…
Rape: विद्यार्थिनीने धक्का दिला म्हणून सिनीअर्सने तिच्यावर केला बलात्कार, शाळेने प्रकरण दाबण्याचा केला प्रयत्न