Uddhav Thackeray : एकनाथ शिंदे यांनी ४० आमदार सोबत घेऊन शिवसेनेशी बंडखोरी केली. त्यांनतर भाजपसोबत मिळून त्यांनी आपले सरकार स्थापन केले. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला व महाविकास आघाडी सरकार कोसळले.
मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पहिल्यांदाच विधान भवनात प्रवेश केला. गेल्या चार दिवसांपासून राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. तसेच उद्धव ठाकरे हे विधान परिषदेचे आमदार आहेत. त्यामुळे विधानभवनात आल्यांनतर ते विधानपरिषदेत येणार का? असा सर्वांना प्रश्न होता. परंतु, त्यांनी सभागृहात प्रवेश केला नाही.
महाविकास आघाडीने विधान भवनातील शिवसेनेच्या कार्यालयात मंगळवारी एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीकरिता उद्धव ठाकरे विधानभवनात आले असल्याचे समजते. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर पहिल्यांदाच सर्व नेते व आमदारांची बैठक पार पडली.
राज्यातील सत्ता गेली असली तरी महाविकास आघाडीची युती कायम ठेवणार असल्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. तसेच इतर अनेक मुद्द्यांवर याठिकाणी चर्चा करण्यात आल्या. महानगरपालिकेच्या आगामी निवडणूका लक्षात घेता ही बैठक घेतली असल्याचे बोलले जात आहे.
या बैठकीला शिवसेनेचे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अंबादास दानवे, राष्ट्रवादीचे अजित पवार, जयंत पाटील छगन भुजबळ तर काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, नाना पटोले उपस्थित होते. तसेच तिन्ही पक्षातील नेते व आमदारही उपस्थित होते.
आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने अनेक निर्णय या बैठकीत घेण्यात आले आहेत. यात महाविकास आघाडीने शक्य असेल त्याठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका एकत्र लढवण्याबातची चर्चा झाली. तसेच महाविकास आघाडी एकसंघ राहणार असल्याचा निर्णयही याठिकाणी घेण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
Lal Singh Chadha: देशात फ्लॉप झाला पण तरीही मोठ्या चित्रपटांचा ‘लाल सिंग चड्ढा’ने केला पराभव, केली ‘एवढी’ कमाई
Bihar : बिहारमध्येही ईडीचे छापेमारीचे सत्र सुरू, फ्लोअर टेस्टच्या आधीच ‘या’ बड्या नेत्यांवर कारवाई
Sharad Pawar : २०२४ च्या निवडणूकीत भाजपला चितपट करायचं असेल तर.., शरद पवारांनी दिला गुरूमंत्र
Shweta Tiwari: श्वेता तिवारीच्या मुलीने ऑटो सीटवर झोपून दिली सेक्सी पोज, फोटो पाहून लोकांनी व्यक्त केली ‘ही’ इच्छा