Share

Devendra Fadanvis : “खोकेवाल्यांच्या सरकारने निष्पाप जिवांचे बळी घेतले. फडणवीस, आता कोणाचा राजीनामा मागणार?”

Devendra Fadanvis

Devendra Fadanvis : आरोग्य सेवेच्या अभावी एका गरोदर महिलेने आपली जुळी मुले गमावल्याची घटना नुकतीच घडली. पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम बोटोशी ग्रामपंचायतीमध्ये ही घटना घडली आहे. यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचावर निशाणा साधला आहे. सामनामधील अग्रलेखाच्या माध्यमातून त्यांनी फडणवीस यांच्यावर वार केला आहे.

या अग्रलेखामध्ये ते म्हणाले की, पालघरमधील साधू हत्याकांडाइतकाच वंदना बुधर हिच्या जुळ्या मुलांचा मृत्यू गंभीर आहे. नुसत्या थातूरमातूर चौकशीचे आदेश देऊन भागणार नाही. सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी २५ हजार ८२६ कोटी रुपयांच्या मागण्या सादर केल्या गेल्या. त्यात सार्वजनिक आरोग्य २२५९, महिला व बाल विकास १६७२, सामाजिक न्याय विकास सहाय्य २६७३, आझादीचा अमृत महोत्सव ५०० असे सर्व कोटीतले आकडे आहेत.

शिवाय रस्त्यांसाठी शेकडो कोटींचे वेगळे आकडे असतानाही वंदना बुधरने आपली जुळी मुले गमावली आहेत. कारण या पैशांचा विनियोग जनतेसाठी नाही तर आमदार-खासदारांना खोकी देण्यासाठी सुरू आहे. खोकेवाल्यांच्या सरकारने निष्पाप जिवांचे बळी घेतले. फडणवीस, आता कोणाचा राजीनामा मागणार?, असे या अग्रलेखात लिहिले आहे.

राज्याच्या आरोग्यव्यवस्थेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. याबाबत त्यांनी लिहिले की, महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेला काय झाले आहे? असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयास पडला आहे. प्रश्नाचे उत्तर सोपे आहे. राज्याच्या आरोग्य व्यवस्थेस लकवा मारला आहे. सध्या मुसळधार पाऊस, महाप्रलय वगैर चिंतेचे वातावरण म्हणजे अस्मानी संकट आहे, पण लकवा मारलेली आरोग्य व्यवस्था म्हणजे फडणवीस – शिंदे गट सरकारची सुलतानी आहे.

ठाण्याजवळच्या ‘मोखाडा’, ‘वाडा’ अशा आदिवासी भागांतील आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे महाराष्ट्राला लाज आणणारे आहेत. दोन घटनांनी तर व्यवस्थेची पोलखोलच केली. ठाण्याजवळील मोखाडा तालुक्यात बोटोशी हे अतिदुर्गम गाव आहे. तेथील मरकट वाडीत वंदना बुधर या आदिवासी महिलेस जुळे झाले. बाळंतपणात काही अडचणी निर्माण झाल्या, पण गावात ना वाहन ना सरकारी आरोग्य केंद्र. उपचारांची आबाळ झाली.

वंदनास प्रचंड रक्तस्राव सुरू झाल्याने मोखाड्यातील डॉक्टरकडे नेण्याचे गावकऱ्यांनी ठरवले, पण दवाखान्यात नेण्यासाठी रस्ताच उपलब्ध नाही. त्यामुळे तिला ‘डोली’तून तीन किलोमीटर मुख्य रस्त्यावर आणले. तोपर्यंत वेळ निघून गेली. वंदनाची जुळी मुले त्या मुसळधार पावसात डोलीतच मृत झाली. महाराष्ट्रातील या अमानुष प्रकारांची दखल उच्च न्यायालयाने घेतली व सरकारला फटकारले, असेही अग्रलेखात म्हटले आहे.

तसेच खोकेवाल्यांच्या सरकारने निष्पाप जिवांचे बळी घेतले. फडणवीस, आता कोणाचा राजीनामा मागणार? असा सवाल उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना विचारला आहे. या अग्रलेखाच्या माध्यमातून त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला चांगलेच फटकारले आहे.

महत्वाच्या बातम्या
Mahavikas Aghadi : विधानपरिषद सभापती निवडीत भाजप-शिंदेंच्या अडचणीत वाढ, ‘मविआ’ला मात्र होणार फायदा
‘गुवाहाटीला जाताना मी एकटा आणि सांगून गेलो, पण…,’ उदय सामंतांचा ठाकरेंबाबत मोठा गौप्यस्फोट
शिंदे सरकारचा एकनाथ खडसेंना ‘दे धक्का’; ‘ते’ १० कोटी महागात पडणार
१५ दिवसांत जिथे हल्ला झाला होता तिथेच एकटा जाऊन..; उदय सामंतांचे शिवसैनिकांना जाहीर आव्हान

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now