ठाकरे गटात आणि शिंदे गटात बऱ्याच दिवसांपासून वाद सुरू आहे. शिवसेना कोणाची हा वाद सध्या कोर्टात प्रलंबित आहे. शिवसेनेचे चिन्ह आणि नाव गोठवण्यात आले आहे. पण या नावावरून आणि चिन्हावरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमनेसामने आले आहेत.
या प्रकरणात आज महत्वाची सुनावणी झाली. केंद्रिय निवडणूक आयोगासमोर ही सुनावणी पार पडली. यावेळी ठाकरे गटाच्या वकीलांनी आणि शिंदे गटाच्या वकीलांनी युक्तीवाद केला. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी शिंदे गटाच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित केले.
कपिल सिब्बल यांनी शिवसेनेच्या घटनेची माहती केंद्रिय निवडणूक आयोगाला दिली. कपिल सिब्बल म्हणाले की, शिवसेनेची घटना कायदेशीर नाही असं शिंदे गट कोणत्या आधारावर म्हणत आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या नेतेपदाची शपथ घेतली होती तर ती कोणत्या आधारावर घेतली होती, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
कपिल सिब्बल यांच्यानंतर देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला. यावेळी ठाकरे गटाचे वकील कामत आणि शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांच्यात चांगलाच वाद रंगला होता. देवदत्त कामत हे जेव्हा युक्तिवाद करत होते तेव्हा शिंदे गटाच्या वकीलांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला.
महेश जेठमलानी यांनी काम यांचा मुद्दा खोडून काढला. यानंतर वातावरण तापले होते. यानंतर दोघांमध्ये वाद इतका वाढला की, केंद्रिय निवडणूक आयोगाला त्यांच्यामध्ये मध्यस्थी करावी लागली. निवडणूक आयोगाने दोघांना शांत केल्याने युक्तिवाद पुन्हा सुरू झाला. दोघांमध्ये प्रतिनिधी सभेच्या मुद्द्यावरून वाद झाला होता.
ठाकरे गटाचे वकील कामत यांनी शिंदे गटाच्या प्रतिनिधी सभेवरून आक्षेप घेतला. ते म्हणाले की, शिंदे गटाची सभा घटनेनुसार नाही. त्यामुळे कायदेशीर लढाईही तापली आहे असं म्हणता येईल. बाहेर जसे शिंदे गटाचे नेते आणि ठाकरे गटाचे नेते भिडतात तसेच त्यांचे वकीलही कोर्टात भिडत आहेत.
महत्वाच्या बातम्या
ज्याने आजवर गाडीतून पेशंटला नेत शेकडो गावकऱ्यांचे प्राण वाचवले त्याचाच अपघातात मृत्यू
शाहरुख खानच्या ‘पठाण’ने अॅडव्हान्स बुकिंगमध्येच केला ‘हा’ विक्रम, कमाईचा आकडा वाचून डोळे फिरतील
१ तास शेतात श्वास घेण्याचे अडीच हजार रुपये; भन्नाट बिझनेस शोधत शेतकऱ्याने कमावला तुफान पैसा
‘मी तुमचा सदैव आभारी आणि ऋणी राहीन’; पंतने उघड केली त्या दोन देवदूतांची नावे ज्यांनी वाचवले होते प्राण