मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज संयुक्त पत्रकार परिषदेत युतीची घोषणा केली. ठाकरे आणि आंबेडकर यांच्यातील युती गेल्या काही दिवसांतच निश्चित झाली होती. त्याबद्दल अधिकृत घोषणा करणे एवढेच बाकी होते.
मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या युतीबाबत माहिती नसून गोंधळात पडण्याची इच्छा नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर आज महाराष्ट्राचे दिवंगत नेते आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त षण्मुखानंदमध्ये आयोजित सभेत उद्धव ठाकरे यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे.
““दोघं नातू एकत्र आल्यानंतर जो डोक्यावर बसेल, त्याला सांगणार जा तू. आता तुझं काही काम नाही”, असे स्पष्ट विधान उद्धव ठाकरेंनी केले आहे. त्यांनी स्पष्ट इशाराच दिला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंचा हा इशारा नेमका कुणाकडे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
प्रकाश आंबेडकर आज आपल्यासोबत आले आहेत. काही वर्षांपूर्वी रामदास आठवले सोबत आले. बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे नातू एकत्र आले होते, मात्र त्यानंतर ते भाजपच्या गोटात गेल्याचे त्यांनी त्यावेळी म्हटले होते.
ज दोन्ही वारसाचे आणि विचारांचे नातू एकत्र आले आहेत. दोघं नातू एकत्र आल्यानंतर जो डोक्यावर बसेल, त्याला सांगणार जा तू. आता तुझं काही काम नाही. असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला आहे.
“देश हुकूमशाहीच्या दिशेला चाललं आहे. हिंदुत्व सगळं थोतांड आहे. हिंदुत्वाच्या आधारावर धोक्याची भींत उभी करायची आणि त्याआडून देशावर पोलादी पकड घट्ट बसवायची. ती अशी बसवायची तुम्ही हु का चू केलं तर याद राखा”. असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला आहे.
“मी शिवसेनाप्रमुखांच्या पुतळ्याला वंदन करुन आलो. त्यांचा आज जन्मदिवस. आज सुभाषचंद्र बोस यांचा सुद्धा जन्मदिवस. आज तिकडे विधान भवनात तैलचित्राचं अनावरण होतंय. मला विचारतात की त्या तैलचित्राचं काय? मी म्हटलं ते बघितलेलं नाही.
ज्या कलाकाराने ते चित्र चितारलं असेल त्यांचा मला अपमान करायचा नाही. पण त्यांना पुरेसा वेळ दिला गेला असेल का? ते महत्त्वाचं आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या तैलचित्राच्या कार्यक्रमावर अभिमान वाटत असल्याचं म्हटलं. पण ते तैलचित्र बसवण्यामागचा हेतू वाईट होता, असा आरोप त्यांनी केला.
“घाईगडबडीत काहीतरी रंगवून घ्यायचं आणि हे तुझे वडील. तर अजिबात ते चालणार नाही. दुसऱ्याचे वडील चोरताना हे लक्ष ठेवा नाहीतर तेही तुम्ही विसरायचे. इकडे शिवसेनाप्रमुखांचा विचार, तिकडे मोदी का आदमी आणि तिकडे शरद पवार गोड माणूस. नक्की कोणाची बोटं लावणार तुम्ही?”, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
महत्वाच्या बातम्या
कोकणातील ‘या’ संस्थेवर शिवसेनेची एकहाती सत्ता; भाजप शिंदेगटाचा सुपडा साफ; उद्धव ठाकरे म्हणाले…
एका दगडात दोन पक्षी, शिंदेंसह भाजपलाही मोठा झटका, ठाकरेंची जबरदस्त राजकीय खेळी
कोकणात ठाकरेंच्या शिवसेनेने केला भाजप अन् शिंदेसेनेचा सुपडा साफ; उद्धवजींनी थेट मातोश्रीवर बोलावत…