उद्धव बेटा आमचा वृद्धाश्रम उध्वस्त झालाय, आम्हाला मदत कर; मुख्यमंत्र्यांच्या शिक्षकेची आर्त हाक

तौक्ते चक्रीवादळामुळे राज्याचे मोठे नुकसान झाले आहे. कोकणासोबतच मुंबईलाही तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसला आहे. या चक्रीवादळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिक्षिकेच्या वृद्धाश्रमाचेही नुकासान झालेले आहे.

सुमन रणदिवे असे या शिक्षिकेचे नाव असून त्यांचे वय ९० वर्षे इतके आहे. त्या उद्धव ठाकरे यांच्यासोबतच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या शिक्षिका आहे. सध्या त्या वृद्धाश्रमात आहे.

वसईमध्ये असलेल्या या वृद्धाश्रमाला चक्रिवादळाचा फटका बसल्याने या वृद्धाश्रमाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या वृद्धाश्रमाला मदत मिळावी, अशी मागणी शिक्षिका सुमन रणदिवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.

सुमन रणदिवे या दादर येथे असलेल्या बालमोहन विद्यामंदीर या शालेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. त्या शाळेत त्या गणित आणि विज्ञान विषय शिकवायच्या. त्यानंतर १९९१ मध्ये त्या निवृत्त झाल्या होत्या.

या चक्रिवादळामुळे आमच्या वृद्धाश्रमाचे मोठे नुकसान झाले आहे. छप्पर उडाले आहे. त्यामुळे सर्व वृद्धांना रात्री झोपण्यासाठी खुप त्रास होतो. मच्छर चावतात. त्यामुळे रात्रभर झोप येत नाही, असे सुमन रणदिवे यांनी म्हटले आहे.

तसेच उद्धव बेटा मला तुला भेटायचे आहे. तु शिवाजी पार्कमध्ये शाळेत असताना मी तुला शिकवले होते. चक्रिवादळामुळे इथली परिस्थिती खुप खराब झाली आहे. कृपया आम्हाला मदत कर, अशी विनंती सुमन रणदिवे यांनी केली आहे.

दरम्यान, चक्रिवादलामुळे आश्रमाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पहिला मजला पुर्ण उध्वस्त झाला आहे. त्यामुळे सगळे वृद्ध तळ मजल्यावर राहत आहे. तोंडावर पावसाळा तातडीने वृद्धाश्रमाला डागडुजी करण्याची गरज आहे.

महत्वाच्या बातम्या-

शाहरुख खानच्या मुलीने केले बिकीनी शुट; फोटोंनी घातला सोशल मीडियावर धुमाकूळ
पोरबंदरमधील गरीब मुलगा कसा झाला जेठालाल? वाचा दिलीप जोशींचा थक्क करणारा प्रवास
नवरदेव जसा कबुल है बोलला, तशी नवरी लागली नाचायला अन् अख्ख्या कुटुंबासमोर केलं नवऱ्याला किस

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.