“मोदींनी केलेल्या छळामुळेच सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांचा मृत्यू झाला”

 

द्रमुकचे प्रमुख एम के स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप लावले आहे. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे सगळीकडेच एकच खळबळ उडाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दबावामुळेच भाजप नेते अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यांचा मृत्यू झाला असल्याचा गंभीर आरोप उदयनिधी स्टॅलिन यांनी केला आहे. तसेच मोदी व्यंकय्या नायडुंसारख्या जेष्ठ नेत्यांना बाजूला सरत असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला आहे.

याआधी नरेंद्र मोदी यांनी उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर टीका केली होती. विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळवण्यासाठी पक्षातील जेष्ठ नेत्यांना डावललं जात आहे, असे मोदी यांनी म्हटले होते, त्याचे उत्तर देत उदयनिधी स्टॅलिन यांनी हा गंभीर आरोप मोदींवर केला आहे.

सुषमा स्वराज नावाची व्यक्ती होती, मोदींनी टाकलेल्या दबावामुळेच त्यांचा मृत्यू झाला. अरुण जेटली नावाची व्यक्ती होती, मोदींनी केलेल्या छळामुळेच त्यांचा मृत्यू झाला, असे धक्कादायक वक्तव्य उदयनिधी स्टॅलिन यांनी केले आहे. ते एका सभेत बोलत होते.

तुम्ही सर्वांनाच बाजूला केलं. मिस्टर मोदी मी इ पलानिस्वामी नाही, जो तुम्हाला घाबरले आणि तुमच्यासमोर झुकेल. मी उदयनिधी स्टॅलिन आहे, अशी टीकाही यावेळी त्यांनी मोदींवर केली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.