Politics: नागालँडमध्ये अलीकडेच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीनंतर राष्ट्रवादीने एनडीपीपी-भाजप युतीला पाठिंबा जाहीर केला आहे. राष्ट्रवादीच्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. तसंच महाराष्ट्रामध्ये असं काही होणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
या निवडणुकीत एनडीपीपी- भाजपाप्रणीत आघाडीला ३७ जागांसह स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ७ जागा मिळाल्या असून पक्ष तिसऱ्या स्थानावर आहे. अशातच राष्ट्रवादीने एनडीपीपी-भाजप युतीला पाठिंबा जाहीर केला आहे. यावरून राजकीय वर्तुळात पडसाद उमटत आहेत.
यावर बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, नागालँडमध्ये निकाल लागल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ७ विधानसभा सदस्य निवडून आले. निवडणुकीच्या काळात तेथील मुख्यमंत्र्यांना आमचा पाठिंबा होता. आमचा पाठिंबा त्या ठिकाणच्या मुख्यमंत्र्यांना आहे, त्यामुळे भाजप बरोबर आम्ही युती केलेली नाही, असे वक्तव्य केले आहे.
नागालँडमध्ये राष्ट्रवादीने भाजपला दिलेल्या पाठिंबावर बोलताना सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांनी एक मोठे वक्तव्य केले. ते म्हणाले, नागालँड मधील बैठकीला मी नव्हतो. त्यामुळे मी भाष्य करणे योग्य नाही. तिथे जे ठरलं तसंच उद्या इथेही ठरेल आणि प्रत्येक ठिकाणी ठरेल. यावर आपण वेट अँड वॉच करायला हव.
त्याचवेळी, राज्यात भाजप राष्ट्रवादी हे दोन पक्ष एकत्र येतील का? या प्रश्नावर त्यांनी झाडाकडे पहात पक्षांचे विचारा पक्षाचे नको, असं म्हणत उत्तर देणं टाळल आहे. त्यामुळे उदयनराजेंच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
उदयनराजे भोसले यांनी आज सातार्यात जिल्हाअधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन विविध प्रश्नांवर निवेदन दिले आहे. यादरम्यान उदयनराजे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी नागालँडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी यांनी एकत्र स्थापन केलेल्या सरकारबाबत सूचक वक्तव्य केलं. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आला आहे.
महत्वाच्या बातम्या
रामदास कदमांचा भाऊ ईडीच्या ताब्यात! उद्धव ठाकरे गटात जाताच ईडीने केली मोठी कारवाई
महाराष्ट्रात पुन्हा पेटणार राजकीय युद्ध! ‘या’ तीन मोठ्या नेत्यांनी ठोकला शड्डू, भाजप-शिंदेंचं टेंशन वाढलं
नागालॅंडमध्ये राष्ट्रवादी भाजपसोबत का गेली? अखेर सुप्रिया सुळेंनी सांगीतले खरे कारण, वाचून धक्का बसेल