“फडणवीसांच्या हाती सत्ता द्या, मी मराठा आरक्षण मिळवून देईन”; उदयनराजे भोसले

मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीसाठी जोरात पाठपुरावा सुरू आहे. यासाठी मराठा समाजाचे नेते विविध ठिकाणी बैठका घेत आहेत. तसेच आज मराठा आरक्षणासंदर्भात खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा अशी मागणी केली आहे.

यावेळी उदयनराजेंनी माजी मुख्यमंत्री व विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करत महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले. तसेच “आता तुम्ही सत्तेत आहात तर ते पुढे न्यावं. तुम्हाला जर हे जमणार नसेल तर पुन्हा फडणवीसांच्या हाती सत्ता द्या, मी आरक्षण मिळवून देईन, असे आश्वासन उदयनराजे यांनी दिले.

“देवेंद्र फडणवीस आपल्याच वयाचे आहे. त्यांनी आरक्षणासाठी काम केलं. ते आपल्याला पुढं न्यायचं आहे. आता तुम्ही सत्तेत आहात ना मग काम करा ना” असे ते म्हणाले. यावेळी बोलताना भोसले यांनी जातीचं राजकारण करायचं असेल तर राजीनामा द्या आणि घरी बसा,’ असा इशाराच राज्यकर्त्यांना दिला आहे.

तर “आरक्षणाचा प्रश्न हा सुटणारच. मराठा समाजाला आरक्षण मिळणार असून सद्या होणाऱ्या प्रवाशांमध्ये देखील मराठा विद्यार्थ्यांना राखीव जागा ठेवण्यात याव्यात” अशी मागणी देखील उदयनराजेंनी केली आहे.

तसेच “या प्रश्नाच्या मुळापर्यंत जात नाही तोपर्यंत मराठा आरक्षण निर्णय मार्गी लागणार नाही. आता पुढची पिढी विचारेल तुम्ही काय केले? प्रत्येकाला आरक्षण दिले. मराठा समाजाला आरक्षण का दिले नाही. त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांनी का विचार केला नाही” असा आरोप त्यांनी केला. तर “देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणासाठी काम केलं तरीही आपण त्यांनाच नावं ठेवतो.” असे ते म्हणाले.

व्हाईट गोल्ड आणि हिरे मोत्यांपासून बनवलेली हॅन्डबॅग जिची किंमत ऐकून धक्का बसेल

भाजप मंत्र्याना डिनरसाठी नकार देणे विद्या बालनला पडले महागात, शुटिंग पाडले बंद

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.