मुंबई | औरंगाबाद शहराच्या नामांतरावरुन राजकारणात अनेक वक्तव्य आणि भुमिका समोर येत आहेत. या मुद्द्यावर राजकारण चांगलेच तापले आहे. यावर आता पहिल्यांदाच भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी भाष्य केले आहे. ‘नामांतर करताना कोणाची मानहानी होऊन उद्रेक होणार नाही याचा विचार करावा,’ असे त्यांनी म्हंटले आहे.
ते याबाबत माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, ‘शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज हे केवळ महाराज होते म्हणून ते ओळखले जात नव्हते. त्यांची कर्तबगारीमुळे आणि लोक हिताच्या निर्णयामुळे ते ओळखत होते. औरंगाबादच्या बाबतीत नाव बदलायचे की नाही याचा लोकशाहीनुसार लोक निर्णय घेतील.’
औरंगाबादच्या नामांतराविषयी चव्हाणांनी सांगितली काँग्रेसची भूमिका….
‘औरंगाबादचे नामांतर हा महाविकासआघाडी सरकारच्या कॉमन मिनिमम प्रोगामचा भाग नाही. औरंगाबादच्या नामांतराला आमचा विरोध आहे. आमची नुरा कुस्ती सुरु नाही तर आम्ही या मुद्द्यावरुन भाजप आणि एमआयएमसोबत थेट नुरा कुस्ती खेळायला तयार आहोत,’ असे काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी सांगितले.
औरंगाबादच्या नामांतराविषयीची शिवसेनेनी पहिल्यांदाच केली भूमिका स्पष्ट…
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी औरंगाबादच्या नामांतराविषयीची शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे. ‘३० वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचं नाव संभाजीनगर असं केलं असल्याची माहिती राऊत यांनी दिली.
पुढे बोलताना ते म्हणाले, ‘औरंगाबादच्या नामांतराविषयीची शिवसेनेची भूमिका सर्वांना माहीत आहे. ३० वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचं नाव संभाजीनगर असं केलं आहे. त्यामुळे त्यावर आता फक्त सही शिक्का उमटायचा आहे.’
महत्त्वाच्या बातम्या
हृदयद्रावक! भंडाऱ्यात शिशु केअर युनिटला आग; दहा नवजात चिमुकल्यांचा मृत्यू
माझा मानसिक, भावनिक आणि आता शाररिक छळ का केला जातोय? कंगनाचा सवाल
मी आदर पूनावालाच्या ऐवजी बाबा रामदेव यांची लस घेणार; अभिनेत्याच्या ट्विटचा सोशल मीडियावर धुमाकूळ