भाजप खासदार उदयनराजेंकडून शरद पवारांची भेट, भेटीचे खरे कारण आले समोर

नवी दिल्ली | राष्ट्रवादी काँग्रेसमधून विधानसभा निवडणुकीपुर्वी भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या उदयनराजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. दिल्लीतील शरद पवार यांच्या निवासस्थानी होणाऱ्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले होते. मात्र उदयनराजे यांनीच या भेटीचे कारण सांगितले आहे.

उदयनराजे यांनी सांगितल्याप्रमाणे ते मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवार यांना भेटले आहेत. पवारांच्या भेटीनंतर आरक्षणाच्या प्रश्नावर उदयनराजे हे पंतप्रधान मोदी यांना भेटणार आहेत. याचा खुलासा स्वत: उदयनराजे यांनी केला आहे.

भाजपचे राज्यसभा खासदार असलेल्या उदयनराजे यांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी भेट ठरल्याची बातमी आल्यानतंर या दोघांमध्ये कोणत्या विषयावर चर्चा होणार आहे. की दुसरे काही राजकीय कारण यामागे आहे असे तर्क लावले जात होते. शरद पवारांच्या भेटीनंतर मराठा आरक्षणाशिवाय इतर मुद्द्यांवर उदयनराजे यांनी बोलणे टाळले आहे.

दरम्यान, संसदेच अर्थसंकल्प अधिवेशन सध्या सुरू आहे. शरद पवार आणि उदयनराजे दोघे राज्यसभेचे खासदार आहेत. त्यामुळे दोघांची सदनामध्ये चर्चा होऊ शकली असती. यामुळे उदयनराजे यांची शरद पवारांच्या निवासस्थानी होणाऱ्या या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते.

यापुर्वी उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी विधानसभा निवडणुकीपुर्वी खासदारकीचा राजीनामा दिला होता. यानंतर सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत शरद पवारांनी घेतलेल्या पावसातील सभेनंतर उदयनराजे यांचा पराभव झाल्याचे बोलले जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! भाजप खासदार उदयनराजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार
आम्ही तिनही राजे एकच; मी मराठा आंदोलकांना आंदोलन मागे घेण्याची विनंती करतो
राज्यसभेत पोहोचताच उदयनराजेंची शरद पवारांवर टीका; म्हणाले…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.