भाजपा आमदारावर लैंगिक अत्या.चार केल्याचा आरोप; राजकीय वर्तुळात उडाली खळबळ

मुंबई | राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेल्या बलात्काराच्या आरोपांनी राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले होते. तर आता भाजपा आमदारावर देखील लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप करण्यात आले आहेत.

मेवाडमधील उदयपूर जिल्ह्यातील गोगुंदा विधानसभा मतदार संघातील भाजपा आ. प्रतापलाल भिल यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. प्रतापलाल भिल यांच्यावर लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप महिलेने केला आहे.

या महिलेने उदयपूर रेंजचे आयजी सत्यवीर सिंह यांच्यासमोर हजर होऊन आपली तक्रार दाखल केली आहे. आ प्रतापलाल भिल यांनी उदयपुरातील सुखेर आणि नीमचमधील फ्लॅटमध्ये शारीरिक संबंध ठेवले होते. आता ते लग्नाच्या आश्वासनापासून लांब जात आहेत, त्यामुळे त्यांच्याविरोधात तक्रार घेऊन आयजीसमोर हजर झाली, असे महिलेने सांगितले.

दरम्यान, उदयपूर पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून आमदार प्रतापलाल भिल यांच्याविरूद्ध एफआयआर दाखल केला आहे. हे प्रकरण सीआयडी सीबीकडे तपासासाठी पाठविले जाणार आहे. याचबरोबर या प्रकरणाची चौकशी सीआयडी सीबी करणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या
अजित पवारांनी सेलिब्रिटींना ‘या’ भाषेत झाप झाप झापले; ‘तेव्हा तुम्हाला कुणी…’
‘शेतकरी आंदोलनातील २०० शेतकऱ्यांना अटक केली, पण…’
ठाकरे सरकारमध्ये पूर्ण उलथापालथीचे संकेत? पवारांचे फक्त तीन वाक्य, अन्…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.