वेटर म्हणाला डोळे दुखतात, अन् तात्याराव लहानेंनी हॉटेलमध्येचं केली उपचाराला सुरूवात

मुंबई | पद्मश्री पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ नेत्ररोग तज्ञ डॉ. तात्याराव लहाने आपणा सर्वांना माहितचं आहेत. त्यांनी डोळ्यांचा आजार असलेल्या अनेक रूग्णांवर शस्त्रक्रिया करून त्यांना नवीन दृष्टी दिली आहे. लहाने यांच्या कार्यामुळे अनेकजण त्यांचे कौतुक करत असतात. तात्याराव लहाने सध्या राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक आहेत.

काल (दि.०८) अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडला आहे. तात्याराव लहाने यांना कामाच्या निमित्ताने विधिमंडळात जावे लागते. कालही ते कामाच्या निमित्ताने विधिमंडळात गेले होते.

विधीमंडळातील कामानंतर ते हॉटेलमध्ये गेले होते. लहाने यांना पाहाताच हॉटेलमधील वेटरने त्यांच्यासाठी चहा आणला. चहा आणून टेबलावर ठेवल्यानंतर लहाने यांना त्या वेटरने डोळ्यांचा त्रास असल्याचं सांगितलं. लहाने यांनी लगेच त्या वेटरच्या डोळ्यांची तपासणी करण्यास सुरूवात केली.

डोळ्यांच्या आजारावरील मोठा तज्ञ दवाखान्यात नाही तर हॉटेलमध्येचं रूग्णांची तपासणी करत असल्याचं पाहून हॉटेलमधील इतर कामगार आणि ग्राहकांनी लगेच तात्याराव लहाने यांच्यासमोर गर्दी केली.

त्यांनीही आपल्या डोळ्यांच्या समस्या सांगण्यास सुरूवात केली. लहाने यांनी त्यांच्याही डोळ्यांची तपासणी केली आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करून औषधे कोणती घ्यायची हे सांगितले. तात्याराव लहाने यांच्या या कार्यामूळे पुन्हा एकदा त्यांचे अनेकांनी कौतुक केले आहे.

दरम्यान तात्याराव लहाने हे खुप मोठे नेत्ररोग तज्ञ आहेत. त्यांच नाव राज्यासह संपुर्ण देशात प्रसिध्द आहे. २००८ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. गेल्या वर्षी त्यांना राजश्री शाहू महाराज पुरस्काराने गौरवण्यात आले होते. सर जे. जे रूग्णालयात नेत्रचिकित्सा विभागाचे विभाग प्रमूख पदावरही त्यांनी काम केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
महिलांच्या कार्याला अनोखा सलाम, आनंद महिंद्रांनी शेअर केला खास व्हिडीओ
काय सांगता! आता भांडी घासण्यासाठी ‘ऑनलाईन’ विकली जातेय ‘चुलीतली राख’
जुन्या साडीचं केलं भन्नाट जुगाड, ‘या’ जुगाडूची कला पाहून भलेभले झाले थक्क; पहा व्हिडीओ

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.