भररस्त्यात गोळीबार करुन डॉक्टर दाम्पत्याची हत्या; घटनेचा थरारक व्हिडिओ आला समोर

देशभरात कोरोनाच्या संकट असताना अनेक धक्कादायक घटना समोर येत आहे. अनेक गुन्हेगारीचे प्रकरण समोर येत आहे. अशातच एक भरदिवसा गोळीबार करुन दाम्पत्याची हत्या करण्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

राजस्थानच्या हिरादास भागात ही घटना घडली आहे. शहरातील हिरादास बसस्थानका जवळील चौकात दोन तरुणांनी दुचाकीवर स्वार होऊन एका चारचाकी वाहनाला अडवत, त्यामध्ये असणाऱ्या एका डॉक्टर दाम्पत्यावर गोळी मारुन हत्या केली आहे.
या दोन तरुणींना त्या वाहनाला भररस्त्यात अडवून गोळी झाडली आहे. तसेच त्यानंतर त्या ठिकाणाहून आरोपींना पळ काढला आहे. ही संपुर्ण घटना त्या भागात असणाऱ्या एका सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

व्हिडिओमध्ये दिसत आहे, की सिग्नल पार केल्यानंतर त्या दोन तरुणांनी चारचाकी वाहनाला ओव्हरटेक केले आहे. त्यानंतर एका तरुणाने गाडीजवळ जाऊन त्या दोघांवर गोळीबार करुन त्यांची हत्या केली आहे.

डॉक्टरांच्या गाडीजवळ तो तरुण चालत जाताना दिसत आहे. त्यांतर डॉक्टर खिडकी बंद करुन स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करतात, पण तोपर्यंत तो तरुण हात असलेल्या बंदुकीने त्या दोघांची गोळी मारुन हत्या करतो.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. त्यामध्ये, ही हत्या बदलेच्या भावनेने करण्यात आली आहे. एका तरुणीच्या हत्या प्रकरणात डॉक्टर दाम्पत्याचा समावेश होता. मृत तरुणीसोबत डॉक्टरांचे संबंध होते, असा आरोप असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

तसेच डॉक्टर दाम्पत्यावर गोळी झाडणारा तरुण हा मृत तरुणीचा भाऊ होता. दोन वर्षांपुर्वी तरुणीची हत्या करण्यात आली होती. त्यापासून तो प्रतिशोधात होता. तरुणीच्या मृत्यु प्रकरणात डॉक्टरच्या पत्नीचा आणि त्यांच्या आईचाही समावेश होता, असे आरोप करण्यात आले आहे. अशी माहिती पोलिसांनी समोर आली आहे.

महत्वाच्या बातम्या-

वडील सावत्र आईचं नाव काढत नाही; तर दुसरीकडे नातू कौतूक करता करता थांबत नाही
माझ्याकडे १ रात्र ये, तुला २ कोटी देतो, श्रीमंत बिझनेसमॅनची मॉडेला ऑफर
DDLJ मधील छुटकी इतकी बदलली, फोटो पाहून नेटकऱ्यांना फुटला घाम, आता करते ‘हे’ काम

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.