एकाच नवरीच्या दारात उभे राहिले दोन नवरदेव, पाहूणेमंडळी झाले हैराण; जाणून घ्या नेमकं काय घडलं

कन्नोज | लग्न म्हटलं की मोठ्या धूमधडाक्यात नवरानवरीच्या वराती काढल्या जातात.  नवरदेव वाजत गाजत लग्नाच्या मंडपात येतो. पण उत्तर प्रदेशच्या कन्नोज जिल्ह्यात एका नवरीशी लग्न करण्यास दोन नवरदेव नवरीच्या दारात येऊन उभे राहिले.

एका मुलीशी लग्न करण्यास दोन तरूण मंडपात आल्याने पाहूणेमंडळींना चांगलेच हैराण झाले. पाहूण्यांमध्ये याची चर्चा सुरू झाली की हा काय प्रकार आहे. मात्र खरा प्रकार समोर आल्याने अनेकांना धक्का बसला.

कन्नोज जिल्ह्यातील ककलापुर गावातील तरूणीचं फूलनपुर येथील तरूणाशी लग्न ठरलं होतं. तरूणीचं एका तरूणाशी प्रेमसंबंध होते आणि त्याच्याशी तिला लग्न करायचं होतं. मुलगी या लग्नाला तयार नव्हती. तिने प्रियकराला फोन करून बोलावून घेतले.

लग्नाच्या दिवशी तरूणीचा प्रियकर मित्रांसोबत तरूणीच्या दारात आला. यावेळी ज्या मुलाशी लग्न ठरलं होतं तो मुलगाही वाजत गाजत वरात घेऊन आला. तरूणीने प्रियकरासोबत लग्न करायचं आहे असं त्या मुलाला सांगितलं.

यामुळे तो तरूण चांगलाच संतापला. त्याने पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिस लग्नाच्या मंडपात दाखल झाल्यानंतर दोन्ही तरूणांना पोलिसांनी समाजावून सांगितलं मात्र कुणीही पोलिसांचं ऐकलं नाही. त्यानंतर पोलिस दोन नवरदेव आणि नवरीला पोलिस स्टेशनला घेऊन गेले.

पोलिसांनी पोलिस स्टेशनला नेऊन दोन्ही नवरदेवाच्या परिवाराला आणि तरूणीच्या परिवाराला समजावून सांगितले. मात्र ती तरूणी  प्रियकरासोबत लग्न करण्यावर ठाम होती. अखेर त्या तरूणीचं लग्न प्रियकराशी लावून देण्यात आलं.

वरात घेऊन वाजत गाजत आलेला नवरदेव यामुळे चांगलाच निराश झाला होता. मात्र गावातीलच एक मुलगी त्या तरूणाशी लग्न करण्यास तयार झाली. या कुटूंबाने मोठ्या धूमधडाक्यात लग्न लावून दिले. या दोन्ही लग्नांची चर्चा जोरदार रंगू लागली आहे.

महत्वाच्या बातम्या-
ट्री मॅन ऑफ इंडिया: तब्बल १ कोटींपेक्षा जास्त झाडे लावली, झाडे लावण्यासाठी जमीनही विकली
मानलं बुवा; घरात जागा नसल्यामुळे पठ्ठ्याने झाडावर बसून काढला विलगीकरणाचा कालावधी
आज राज्यातील ‘या’ भागात धडकणार ताऊते चक्रीवादळ; हवामान खात्याने सांगीतले ‘असा’ करा बचाव
रियल सिंघमने उडवली दौंडमधील काळे धंदेवाल्यांची झोप! सर्व धंदे बंद करत केला साडेचार कोटींचा माल जप्त

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.