आंटी म्हणताच महिलेला आला राग; भरबाजारात महिलांची सुरू झाली हाणामारी, पहा व्हीडिओ

एखाद्या महिलेला आंटी म्हणल्यानंतर तिची काय प्रतिक्रिया असेल काही सांगता येत नाही. कित्येकदा अनेकांना असा अनुभव आला असेल की आंटी म्हणल्यानंतर एखाद्या महिलेला राग येतो.

जरी त्या महिला वयस्कर असल्या तरी त्यांना राग येतो. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशमध्ये घडला. एका महिलेने बाजारामध्ये एका महिलेला आंटी म्हणून हाक मारली असता त्या महिलेची तळपायाची आग मस्तकात गेली आणि तिने दुसऱ्या महिलेला चोप दिला.

दोघींची भरबाजारात भांडणे सुरू झाली. या मारहाणीचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या बाजारात काही महिला करावा चौथची शॉपिंग करण्यासाठी आल्या होत्या.

पण अचानक दोन महिलांमध्ये हाणामारी सुरू झाली याचे कारण होते आंटी हा शब्द. एका दुकानात काही महिला खरेदी करत होत्या. त्यांच्या मागून काही महिला आल्या आणि त्यांना बाजूला करण्यासाठी बोलल्या की आंटी थोडं साईडला होता का? यामुळे तिथेच हाणामारी सुरू झाली.

ज्या महिलेला आंटी म्हणाले होते तिला प्रचंड राग आला आणि बघता बघता दोन्ही गटातील महिलांमध्ये हाणामारी सुरू झाली. दोन्ही हातांनी एकमेकांचे केस उपटणे, चापट मारणे हा प्रकार सुरू झाला. पोलिसांना माहिती मिळताच महिला पोलीस घटनास्थळी दाखल झाल्या.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.