दोन जुळ्या बहिणींनी झाले एकाच बॉयफ्रेंडवर प्रेम, आता प्रेग्नेंट होण्यासाठी दोघींची धडपड

ऑस्ट्रेलियात एक विचित्र प्रकार समोर आला आहे. दोन बहिणींना एकाच मुलावर प्रेम जडले आहे. त्या दोघींचे नाव आहे ऍना आणि लुसी डिंसीक. पण त्यांनी एकाच व्यक्तीसोबत जगायचं ठरवल्याने त्या चर्चेत आल्या आहेत. त्या दोघींचा एकच बॉयफ्रेंड असल्याने सगळ्यांच्या भुवया उंचवल्या आहेत.

या बहिणींना असा दावा केला आहे की त्या दोघी जगातील सर्वाधिक जवळीक असलेल्या जुळ्या बहिणी आहेत. आम्ही प्रत्येक गोष्ट सोबत करतो. अगदी त्यांनी आता सोबत प्रेग्नेंट होण्याचाही निर्णय घेतला आहे. त्या दोघी एकसारखेच कपडे घालतात. सारखाच मेकअप करतात.

सोबतच अंघोळ, जेवण आणि व्यायामही सोबत करतात. दैनदिन व्यवहारातील अनेक गोष्टी त्या सोबतच करतात. अगदी झोपतानादेखील त्या एकत्रच झोपतात. नेहमीच सोबत राहिल्याने त्यांच्या दिसण्यात आणि वागण्यात तुम्हाला जास्त फरक जाणवणार नाही. त्यामुळे त्यांच्यातील वेगळेपण शोधण्यात तुम्हाला कठीण जाईल.

तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटले असेल की त्या दोघींचा बॉयफ्रेंडसुद्धा एकच आहे. त्याचे नाव बेन आहे आणि त्याचे वय ४० वर्ष आहे. तो दोघींसोबत राहतो. या दोघींना सोबतच बेनपासून प्रेग्नेंट व्हायचे आहे. पण त्यांच्यामध्ये ऑस्ट्रेलियातील कायदा अडथळा आणत आहे.

या दोघी बेनला २०१२ ला भेटल्या होत्या. तो एक मॅकेनिक आहे. दोघींना त्याच्यासोबत लग्न करायचे आहे. मात्र ऑस्ट्रेलियातील कायद्यांमुळे त्यांना त्याच्यासोबत लग्न करता येत नाहीये. ऑस्ट्रेलियात एकाच व्यक्तीला दोन लग्न करण्यास बंदी आहे.

त्यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे की, या दोघी अनेक वर्षांपासून त्याच्यासोबत लग्न करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी ही कहाणी एका टीव्ही चॅनेलला मुलाखत देताना सांगितली. ही मुलाखत देताना त्या खुप भावूक झाल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या
पाच दिवसानंतर वाघ परतला; नक्षलवाद्यांकडून ‘त्या’ कोब्रा कमांडोची सुटका
संभाजी भिडे सर्वात बावळट व्यक्ती; अशा सडक्या मेंदूची विकृत पैदास वेळीच ठेचली पाहिजे
सनी देओलला चित्रपटात घेतले तर पुढच्या चित्रपटात धर्मेंद्र फुकट काम करणार; बाप लेकाची अजब ऑफर
मोठी बातमी: अनिल देशमुखांचा पाय आणखी खोलात, सुप्रीम कोर्टाने दिला दणका

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.