Share

Snakebite : झोपेत साप चावल्याने एकाच घरातील दोन चिमुकल्या भावंडांचा मृत्यू; कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

Snakebite

Snakebite : सध्या राज्यभर जिकडेतिकडे अतिवृष्टीने छापा टाकला आहे. जोरदार पावसामुळे घरेच्या घरे वाहून गेले आहेत. तसेच पावसाळ्यामुळे साप विंचू यासारखे विषारी प्राणीही अनेकदा बाहेर येत असतात. अलीकडे साप चावून मृत्यू झाल्याच्या घटना सर्वत्र वाढलेल्या आहेत.

अशीच एक थरकाप उडवणारी घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे. भंडारा जिल्ह्यात मोहाडी तालुक्यातील देव्हाडा खुर्द येथे राहत असलेल्या दोन चिमुकल्यांसोबत ही धक्कादायक घटना घडली आहे. सुशील बलवीर डोंगरे वय ८ वर्षे व उत्कर्ष बलवीर डोंगरे वय ११ वर्षे असे या भावंडांचे नाव आहे.

सुशील व उत्कर्ष रविवारी रात्री एकाच ठिकाणी झोपले होते. दोघेही झोपेत असताना मागच्या दारातून साप रात्री आत शिरला. त्याने दोघांनाही दंश केला. ते कळताच दोन्ही भावंडांना कुटुंबीयांनी तुमसर येथील शासकीय रुग्णालयात नेले. तिथे प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने दोघांनाही भंडारा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र, मोठा भाऊ उत्कर्ष याचा रात्री १२.४५ मिनिटांनी भंडारा येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, लहान भाऊ सुशीलला रात्रीच भंडाऱ्यातून नागपूरमधील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले होते. दुर्दैवाने सोमवारी सकाळी ९.३० वाजता त्याचादेखील मृत्यू झाला.

पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी विनोद चरपे हे घटनेची माहिती मिळताच सकाळी देव्हाडा खुर्द येथे पोहोचले आहेत. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. एकाच घरातील दोन्ही मुले गमावल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे.

मृत्यू हा कधी आणि कसा समोर येईल हे कोणालाच सांगता येत नाही. त्यात साप म्हटलं की भल्याभल्यांचा थरकाप उठतो. जर तो चावला तर मग काही खरं नसते. साप चावल्यानंतर कधी एखाद्याचा जीव जाईल हे सांगता येत नाही. राज्यात सध्या सर्पदंशाच्या अनेक घटना समोर येत आहेत.

महत्वाच्या बातम्या
T20 world cup : अखेर BCCI ने जाहीर केला टी-२० साठी भारतीय संघ; वाचा कोणत्या खेळाडूला मिळाली संधी
..तर उदय सामंतांना जिवंत जाळू, नाना पटोलोंसमोरच कार्यकर्त्याची जाहीर धमकी
VIDEO : Sharad Ponkshe : समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नातं काय? शरद पोंक्षे म्हणाले…
शिंदे फक्त काही महीन्यांसाठीच? फडणवीसच होणार पुढचे मुख्यमंत्री, बावनकुळेंच्या वक्तव्याने शिंदे टेंशनमध्ये

ताज्या बातम्या इतर राज्य

Join WhatsApp

Join Now