शिक्षण घेण्यासाठी एकत्र राहत होत्या बहिणी, नंतर दोघींनी लग्न करून थाटला संसार

झारखंड | आजच्या काळात काय घडेल काही सांगता येत नाही. लॉकडाऊनमध्ये आपण अशा अनेक गोष्टी घडताना पहिल्या आहेत ज्यांचा आपण विचारही करू शकत नाही. कोरोनाने आपल्याला बरेच चांगले आणि वाईट धक्के दिले आहेत.

काही दिवसांपूर्वी १२ वीच्या दोन अल्पवयीन मुलांनी लग्न केल्याची घटना घडली होती. झारखंडमध्येही अशाच प्रकारची पण थोडी वेगळी घटना घडली आहे. येथे कोरडमा जिल्ह्यात दोन चुलत बहिणींनी एकमेकींशी लग्न केलं आहे.

या दोघी बहिणी काही वर्षांपासून शिक्षणासाठी झुमरीतलैया येथे एकत्र राहत होत्या पण त्या दोघींच्या अचानक लग्नाने त्यांच्या कुटुंबियांना धक्का बसला आहे. या दोघींमधील एकीचे वय २४ आहे तर एकीचे वय २० वर्षे आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या दोघी गेल्या ५ वर्षांपासून एकमेकांशी प्रेम करत होत्या.

कुटूंबियांना आपले प्रेम मान्य होणार नाही यासाठी त्यांनी शिक्षणाचा बहाणा करत दुसऱ्या गावात राहण्याचा निर्णय घेतला होता. एकत्र राहत असताना त्यांनी असताना या दोघींनी न्यूयॉर्कमधील अंजली चक्रवर्ती व सूफी संडल्स यांच्या लग्नाबद्दल ऐकले होते आणि पाहिले होते.

त्यांनी ज्या प्रकारे लग्न करून संसार थाटला त्या प्रकारे आपणही संसार थाटावा अशी त्या दोघींची इच्छा होती. अखेर त्या दोघींनी लग्न करायचे ठरवले आणि झुमरीतलैया येथील एका शिव मंदिरात दोघींनी लग्न केले. त्यांच्या या अशा अचानक लग्नाने दोघींच्याही कुटुंबियांना धक्का बसला असून सध्या ते या दोन्ही मुलींशी बोलत नसल्याचे समोर आले आहे.

महत्वाच्या बातम्या

..तर तुम्ही शेतकऱ्यांना धन्यवाद म्हणा, रितेश देशमुखचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

‘आधी घरातला अंधार दुर करा आणि मग दिल्लीला उजेड पाडायला जा’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.