काय सांगता! ३०० रुपयांच्या चप्पला विकत घेऊन या बहिणी कमवताय लाखो रुपये, जाणून घ्या कसं

 

कमी वयात व्यवसाय सुरु करण्याचे स्वप्न अनेक तरुण तरुणी बघत असतात. पण जर व्यवसाय सुरु करताना तुमची कल्पना भन्नाट असेल किंवा जर लोकांच्या गरजा तुम्ही समजू शकलात तर तुम्ही खुप कमी वेळात व्यवसाय चांगलाच वाढवू शकतात.

आजची ही गोष्ट अशाच दोन बहिणींची आहे, ज्यांनी लोकांच्या गरजा समजून घेतल्या आणि व्यवसाय सुरु केला. आता त्या व्यवसायातून त्या लाखो रुपयांची कमाई करत आहे.

सध्या ऑनलाईन खरेदीवर लोकांचा चांगलाच भर आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये राहणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींनी स्वता:चा ऑनलाईन चप्पला विक्रीचा व्यवसाय सुरु केला आहे. या दोन बहिणींचे नाव नाजिश आणि इंशा असे आहे.

त्यांनी हा व्यवसाय अवघ्या ३०० रुपयांच्या चप्पलांपासून सुरु केला असून त्या या व्यवसायातून वर्षाला ३ लाख रुपयांची कमाई करत आहे. विशेष म्हणजे त्यांना परदेशातून सुद्धा ऑर्डर येत आहे.

लखनऊमध्ये राहणाऱ्या नाजिशने आपल्या बहिणीबरोबर या व्यवसायाला सुरुवात केली होती. २०१६ मध्ये नाजिशला आपल्या भावाकडून ऑनलाईन बिझनेसची माहिती मिळाली होती. तेव्हा तिच्या असे लक्षात आले की पुढे ऑललाईन बिझनेसमध्ये मोठी वाढ होणार आहे, त्यासाठी आपण काही तरी केले पाहिजे.

नाजिश यांच्या घरात आधीपासूनच सँडल, चप्पला तयार केल्या जायच्या. एक दिवशी नाजिशने तिच्या आईकडून ३०० रुपये घेतले आणि मार्केटमधून एक सँडल खरेदी केला. तिने या सँडलवर आपल्या मनाप्रमाणे क्रिएटिव्ह डिझाईन करुन त्याचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला.

त्यानंतर जवळपास एका महिन्याने तिला पहिली ऑर्डर मिळाली. त्यातुन तिचा खुप आत्मविश्वास वाढला आणि तिने व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला. तिने बहिण इंशा सोबत मिळून Talking Toe नावाचे स्वत:चे सोशल मीडिया पेज सुरु केले.

देशात कोल्हापुरी चप्पलांची मागणी वाढत असल्याने त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कोल्हापुरी चप्पलांवर क्रिएटीव्ह डिझाईन तयार करण्यास सुरुवात केली आहे. त्या चप्पलांवर डिझाईन करताना त्या ट्रेंड आणि फॅशन्सनुसार काम करत असतात. त्यांचा हा व्यवसाय ऑनलाईन असल्याने इटली, सिंगापुर, युके, अमेरिका, दुबई अशा वेगवेगळ्या देशातून त्यांना ऑर्डर्स येतात.

त्यांनी आतापर्यंत १५ हजारांपेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रकारच्या डिजाईन्स तयार केल्या आहे. त्यांच्या या व्यवसायातून त्यांना वर्षाला ३ लाख रुपये मिळत आहे. तसेच नाजिशने हे काम करण्यासाठी आपल्यासोबत ४ जणांना कामासाठी ठेवले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.