Homeताज्या बातम्या११ वर्षांपूर्वी शेंगा विकणाऱ्याने फुकटात दिल्या होत्या शेंगा, भावा-बहिणीने अमेरिकेतून येऊन फेडले...

११ वर्षांपूर्वी शेंगा विकणाऱ्याने फुकटात दिल्या होत्या शेंगा, भावा-बहिणीने अमेरिकेतून येऊन फेडले कर्ज

सोशल मीडियावर सध्या दोन व्यक्तींची जोरदार चर्चा आहे. खरे तर पूर्वी अमेरिकेत राहणारे दोन एनआरआय भाऊ-बहीण २५ रुपयांचे कर्ज फेडण्यासाठी भारतात आले होते. येथे त्याने आंध्र प्रदेशातील आपल्याला एकेकाळी शेंगा विकणाऱ्या माणसाचा शोध घेतला ज्याने त्यांना ११ वर्षांपूर्वी मोफतमध्ये शेंगा दिल्या होत्या. त्यांचे वडिल मोहन यांनी त्यांच्यासाठी मोफत शेंगा घेतल्या होत्या.

इतके वर्षे झाले असतानाही आपल्यावर दुसऱ्याने केलेले उपकार फेडण्यासाठी ते आंध्र प्रदेशातील त्या माणसाला भेटले आहे. तसेच त्यांना २५ हजार रुपये देऊन त्यांचे कर्ज फेडले आहे. त्यामुळे या भाऊ-बहिणींची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा असून अनेकजण त्यांचे कौतूक करत आहे.

२०१० ला या गोष्टीला सुरुवात झाली होती. मोहन आपला मुलगा प्रणव आणि मुलगी सुचिता यांच्यासह आंध्र प्रदेशातील यु कोथापल्ली बीचवर फिरायला आला होता. यावेळी मोहनने आपल्या मुलांना खाण्यासाठी उकडलेल्या शेंगा खरेदी केल्या होत्या. पण पैसे देण्याची वेळ आली तेव्हा त्याच्या असे लक्षात आले की तो त्याचे पाकिटच घरी विसरला आहे. त्यामुळे त्याला पैसेच देता आले नाही.

सत्तैया असे त्या शेंगा विकणाऱ्या माणसाचे नाव होते, त्याने देखील पैसे मागितले नाही आणि मोफतच शेंगा दिल्या. मोहनने सांगितले मी लवकरच तुझे पैसे परत देईल. यावेळी मोहनने त्याचा एक फोटो देखील घेतला. पण नंतर मोहन ते विसरुन गेला आणि अमेरिकेला परतला. आता ११ वर्षानंतर मोहनची मुलं भारतात आली आहे.

भारतात आल्यानंतर त्या बहिण-भावांनी आधी आपल्यावर असलेलेल ऋण फेडण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याला शोधणं फार कठिण होतं. त्यामुळे त्यांनी काकीनाडा शहरातील आमदाराची मदत घेतली. काकीनाडा शहरातील आमदार चंद्रशेखर रेड्डी यांनी आपल्या फेसबूक अकाऊंटवरुन त्यांची पोस्ट शेअर केली.

चंद्रशेखर रेड्डींची पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली. त्यानंतर काही लोकांन सत्तैयाबद्दल माहिती दिली. दुर्दैवाने तो या जगात नाही, पण त्याचे कुटुंबिय आहे. त्यामुळे प्रणव आणि सुचिताने २५ हजारांची रक्कम त्यांना देण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना २५ हजार रुपये दिले.

महत्वाच्या बातम्या-
भारीच! आता ६ हजारांपेक्षा कमी रुपयांत घ्या ‘या’ तगड्या ब्रँडचे स्मार्टफोन; जाणून घ्या त्यांचे फिचर्स
किल्ले रायगडावर सुरु होता ‘हा’ गैरप्रकार, संभाजीराजेंनी माहिती मिळताच आरोपींना शिकवला धडा
माजी मुख्यमंत्री राणेंना मिळणार आजन्म कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा; मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय