नवी मुंबईमधील(Navi MUmbai) घणसोली येथून स्थानिक सोसायटीच्या निवडणुकांमध्ये दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शुक्रवारी घणसोली येथील माऊली कृपा सोसायटीच्या संचालकपदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत दोन गटांमध्ये हाणामारी झाली आहे.(two rival groups fight in housing society in navi mumbai )
घणसोली येथील माऊली कृपा सोसायटीच्या संचालकपदाच्या निवडणुकीत परिवर्तन आणि उन्नती पॅनल आमने-सामने आहेत. यामुळे सोसायटीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी माऊली कृपा सोसायटीमध्ये माघी गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दोन गटांत बाचाबाची झाली.
त्यावेळी सोसायटी बाहेरून आलेल्या तरुणांनी सोसायटीमधील दिलीप चिकणे यांना बेदम मारहाण केली. त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. दिलीप चिकणे यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. ही मारहाण परिवर्तन पॅनलचे सौरभ शिंदे यांनी केली आहे, असा आरोप उन्नती पॅनलने केला आहे.
#NaviMumbai: घणसोली येथे सोसायटी मध्ये शुक्रवारी रात्री तुंबळ हाणामारी चा प्रकार घडला pic.twitter.com/Z3OILRTiFz
— Mulukhmaidan (@MulukhMaidan) February 5, 2022
या प्रकरणात पोलिसांनी मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. माऊली कृपा सोसायटीच्या संचालकपदाची निवडणूक पार पडेपर्यंत सोसायटीला पोलीस सरंक्षण देण्यात यावे, अशी मागणी उन्नती पॅनलने केली आहे. ही निवडणूक सोसायटीची जरी असली तरी येत्या काळात नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक होणार आहेत.
या निवडणुकीत घणसोली परिसरातील इमारतीच्या पुनर्वसनाचा प्रश्न पुढे आला आहे. घणसोली परिसरात माथाडी कामगारांची २५० ते ३०० घरे आहेत. त्यामुळे सोसायटीच्या निवडणुकांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उतरले आहेत. घणसोली परिसरातील घरांच्या पुनर्विकासाचे काम सध्या सुरु आहे.
पुनर्विकासाचं काम हातून जाऊ नये, यासाठी राजकीय पक्षाचे नेते कामाला लागले आहेत. या निवडणुकीतील परिवर्तन पॅनल हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मानला जात आहे. तर उन्नती पॅनल भाजप पक्षाचा असल्याचे सांगितलं जात आहे. शुक्रवारी परिवर्तन पॅनलकडून सोसायटीमध्ये जेवण ठेवण्यात आलं होत. त्यावेळी दोन गटांमध्ये हाणामारी झाली आहे.
महत्वाच्या बातम्या :-
अंबानींनी खरेदी केली आलिशान कार; कारवर जेवढा टॅक्स भरलाय त्यात ३/४ कार येतील
देवोलिनाच्या साखरपुड्याचे सत्य समोर आल्यानंतर चाहते भडकले, म्हणाले, ‘आमच्या भावनांशी खेळू नको’
आईच्या आठवणीत भावूक झाला अर्जुन कपूर; म्हणाला, ‘मी तुझ्याशिवाय अपुर्ण आहे, लव्ह यू’