दोघांचा अकाऊंट नंबर एकच, एक पैसे टाकायचा तर दुसरा मोदींनी पाठवले म्हणून काढायचा

भोपाळ | भोपाळ येथील दोन व्यक्तींना बँकेने एकच अकाऊंट नंबर दिल्याने त्यांना मोठा मनस्ताप आणि त्रासाला सामोरे जावे लागले आहे. यातील एक व्यक्ती आपल्या कष्टाची कमाई बँकेत टाकत होता तेच पैसे दुसरा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाठवले म्हणून काढत होता.

आता ही संपूर्ण रक्कम परत करायची वेळ आल्यानंतर पैसे काढणाऱ्यासकट बँक कर्मचाऱ्यांना घाम फुटला आहे. मध्य प्रदेशच्या भिंड जिल्ह्यातील अलमपूर येथे असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये हा प्रकार घडला. रूरई गावातील हुकूम सिंह आणि रोनी गावातील हुकूम सिंह या दोघांनी या बँकेत आपले खाते उघडले होते.

पण बँक अधिकाऱ्याने या दोघांना एकच खाते क्रमांक दिला. खाते उघडल्यानंतर रूरईचे हुकूमसिंह पोटापाण्यासाठी हरियाणाला गेले होते. तिथे ते काम करून पैसे आपल्या खात्यात टाकत होते. पण दुसरीकडे रोनी गावचे हुकूमसिंह हर पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठवले असे समजून काढून घेत होते आणि खर्च करत होते.

असे त्यांनी सुमारे ६ महिन्यात ८९ हजार रुपये काढले. या प्रकरणाचा खुलासा १६ ऑक्टोबरला झाला. रूरईच्या हुकूमसिंह यांना जमीन खरेदी करण्यासाठी पैसे काढायचे होते. ते बँकेत गेले असता त्यांना धक्काच बसला कारण त्यांच्या खात्यात फक्त ३५ हजार रुपये शिल्लक होते.

अधिकाऱ्यांना त्यांनी जाब विचारला पण त्यांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. पण चौकशीत हा सगळा प्रकार उघडकीस आला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांची सगळी रक्कम परत करण्याची ग्वाही बँकेने दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-
‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेत्रीचा कोरोनामुळे झाला मृत्यू
शीतल आमटे आ.त्महत्या प्रकरणाला नवे वळण, पोलीस तपासात धक्कादायक माहिती आली समोर…
रोहितच्या एक्स गर्लफ्रेंडचा मोठा खुलासा, म्हणाली रोहितने माझ्यासोबत हॉटेलमध्ये येऊन…
मोठी बातमी! सिरमने मागितली कोरोना लसीची आपत्कालीन परवानगी, यादिवशी मिळणार लस

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.