Share

‘हे’ दोन भारतीय फलंदाज करू शकतात ६ षटकात १०० ते १२० धावा, गावसकर यांचा मोठा दावा

भारतीय संघ ९ जून पासून दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात मैदानात उतरणार आहे.  ही मालिका ५ टी-२० सामन्यांची होणार आहे. नवीन खेळाडूंच्या कामगिरीकडे या मालिकेत विशेष लक्ष असणार आहे,कारण या वर्षाच्या अखेरीय टी-२० विश्वचषक खेळवला जाणार आहे.

टी-२० विश्वचषक समोर ठेवून भारतीय संघ आपली तयार करत आहे. नवीन खेळाडूंना आजमवण्यासाठी आफ्रिकेच्या विरोधात अनुभवी खेळाडूंना आराम दिला आहे. भारताचे माजी फलंदाज सुनील गावस्कर यांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे.

सुनील गावस्कर यांनी भारताच्या अशा दोन खेळाडूंची नावे घेतली आहेत की, सुनील गावस्कर या दोन खेळाडूंना मॅच  विनर देखील मानतात. हार्दिक पांड्या आणि ऋषभ पंत ह्या दोन खेळाडूंची नावे सुनील गावस्कर यांनी घेतली आहेत. नुकत्याच पार पडलेल्या आयपीएलमध्ये दोघेही फॉर्ममध्ये होते.

भारताचे माजी फलंदाज सुनील गावस्कर यांनी मुलाखतीमध्ये मोठं वक्तव्य केलं आहे. सुनील गावस्कर यांनी सांगितले आहे की, हार्दिक पांड्या आणि ऋषभ पंतने ५-६व्या क्रमांकावर फलंदाजी केली तर शेवटच्या सहा षटकात ते १००-१२० धावा करू शकतात.

आयपीएलनंतर आता सर्वांचे लक्ष हार्दिक पांड्यावर लागून राहिले आहे. हार्दिक पांड्या सहा महिन्यानंतर भारतीय संघात पुनरागमन करत आहे. २०२१ च्या विश्वचषकानंतर हार्दिक पांड्या भारतीय संघासाठी खेळलेला नाही. हार्दिक पांड्याने आयपीएल २०२२ मध्ये सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.

गुजरात टायटन्ससाठी हार्दिक पांड्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली होती. मोहम्मद शमीसह पावरप्लेमध्ये गोलंदाजी देखील केली आहे. ऋषभ पंतने आयपीएलमध्ये दिल्लीचे नेतृत्व करताना १५१ धावा केल्या आहेत आणि ऋषभ पंतला आयपीएल २०२२ मध्ये एकही अर्धशतक झळकवता आले नाही.

महत्वाच्या बातम्याः-
…तर भारत पाकिस्तानचे तीन तुकडे करुन टाकेल; इम्रान खान यांचे धक्कादायक विधान
दिनेश कार्तिकसोबत हार्दिक पांड्याने निभावली मैत्री, स्वता कार्तिकने केले कौतुक, म्हणाला…
फडणवीसांनी संधी साधली! आता शिवसेनाच अडकली संकटात, राज्यातली सत्ता धोक्यात?

 

 

खेळ ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now