Homeताज्या बातम्यानागपूरमधल्या दोन तरुणींनी केला साखरपूडा; जाणून घ्या कशी जुळली त्यांची रेशीम गाठ

नागपूरमधल्या दोन तरुणींनी केला साखरपूडा; जाणून घ्या कशी जुळली त्यांची रेशीम गाठ

असे म्हणतात प्रेम हे आंधळं असतं. ते कधीच जात-पात, रंग, धर्म, लिंग बघत नाही. त्यामुळे काही प्रेम कहाण्या अनेकदा चर्चेत येत असतात. आता अशीच एक प्रेम कहाणी नागपूरमधून समोर आली आहे. समाजातील तथाकथित रुढींना झुगारुन दोन तरुणींनी साखरपूडा केला आहे.

नागपूरची रहिवासी डॉ. सुरभी मित्रा आणि कोलकात्याची पारोमिता यांनी नुकताच साखरपूडा केला आहे. दोघींनी लग्न करण्याचा निर्यण घेतला असून अनेकांनी त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहे. सध्या संपुर्ण परिसरात त्यांच्या सारखपूड्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.

नागपूरची सुरभी मित्रा डॉक्टर आहे. तर बंगालच्या कोलकात्यामध्ये राहणारी पारोमिता ही एक कॉर्पोरेट कंपनीत उच्चपदस्थ अधिकारी आहे. नागपूरमधील एका हॉटेलमध्ये या दोघींचा साखरपूडा पार पडला आहे. लवकरच या दोघी लग्नबंधनात अडकणार असून त्यांना यासाठी त्यांच्या कुटुंबियांनीही पाठिंबा दिला आहे.

तसेच या दोघींनाही आई होण्याची इच्छा असून त्या मूल दत्तक घेणार आहे किंवा सरोगसीचा पर्याय निवडणार आहे. मी मुलीसोबत आयुष्य व्यतीत करण्याचा निर्णय घेतला, तेव्हापासून मला कधीच विरोध झाला नाही. मित्र, नातेवाईक, कुटुंब, नातेवाईक, भांवंडं, सगळ्यांनीच स्वीकारलं, एकाही व्यक्तीने माझ्याशी संबंध तोडले नाहीत, उलट पाठिंबाच मिळत गेला, असं सुरभी मित्राने सांगितले आहे.

सुरभीने वयाच्या १९ व्यावर्षी , सगळ्यात आधी वडिलांना सांगितलं होतं. त्यालाही आता अकरा वर्ष झाली. बाबांची प्रतिक्रिया सुरुवातीला तटस्थ होती. ही फेज आहे, निघून जाईल, असं त्यांचं म्हणणं होतं. दोन वर्षांनी जेव्हा आमचं बोलणं झालं, तेव्हा आपल्याला आजही महिलांविषयी रोमँटीक अट्रॅक्शन वाटल्याचं मी त्यांना सांगितलं. माझे वडील डॉक्टर आहेत. त्यांनी अभ्यास केला, काही मानसोपचार तज्ज्ञांशी ते बोलले. त्यांना या विषयी माहिती मिळाली, तसा त्यांचा विरोध मावळला, असे सुरभीने म्हटले आहे.

माझी आई म्हणत होती, की घरी तुम्ही एकमेकींसोबत राहा मात्र तुमचं नातं जगजाहीर कशाला करता. मात्र मी ज्या सुदायाचं प्रतिनिधित्व करते, त्यांना माझ्या मोकळ्या वर्तनाने बळ मिळेल. जर एखादी सुशिक्षित तरुणी आपल्या लैंगिकतेविषयी मोकळेपणाने बोलली, तर आणखी लोकांना प्रेरणा मिळेल, असे सुरभीने म्हटले आहे.

पारोमिता आणि सुरभीची भेट कोलकात्यामध्ये झाली होती. सुरुवातीला इन्स्टाग्राम आणि नंतर व्हॉट्ऍपवर दोघांचे बोलणे सुरु झाले. त्यानंतर मैत्रिचे रुपांतर प्रेमात झाले. त्यावेळी पारोमितानेच सुरभीला प्रपोज केला. त्यावेळी सुरभीचा फोन ७-८ दिवसांसाठी बंद आला. त्यानंतर पारोमिताने न राहवून विचारलं की ठीक आहे ना. त्यावेळी तिची काळजी सुरभीला जाणावली आणि तिने तिच्या प्रपोजला होकार कळवला.

महत्वाच्या बातम्या-
टाटांचा दणका ! ‘या’ कंपनीला मागे टाकत टाटा मोटर्सची भारतात सरशी
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागन; ट्विट करत लोकांना केले ‘हे’ आवाहन
दारूने तंगाट असलेल्या आर्यन खानने एअरपोर्टवर केली लघवी? ‘जाणून घ्या’ व्हायरल व्हिडिओतील सत्य

ताज्या बातम्या