मुंबई : कोरोना लस घेतलेले दोन डॉक्टर पॉझिटिव्ह निघाल्याने औरंगाबादमध्ये खळबळ उडाली आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आल्याने त्यांची चाचणी केली असता, पॉझिटिव्ह आढळून आहे.
कोरोनामुळे संपूर्ण जगभरात चिंताजनक वातवरण आहे. जानेवारी महिन्यात लसीकरणाला सुरूवात झाल्यानंतर सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला. असे असतानाच पहिला डोस घेतलेल्यांपैकी दोन डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
लसीचे दोन डोस घेतल्यानंतर चौदा दिवस उलटल्यास शरीरात अँटिबॉडी तयार होते, असे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.नीता पाडळकर यांनी सांगितले. पाडळकर यांनी सांगितले की, या डॉक्टरांमध्ये कोरोनाची सौम्य स्वरूपाची लक्षणे आढळली आहेत.
म्हणजेच त्यांना पहिल्या डोसनेही काही प्रमाणात प्रोटेक्शन मिळत आहेत. मात्र संपूर्ण प्रोटेक्शन दुसरा डोस घेतल्यावर १४ दिवसांच्या नंतरच मिळू शकते. त्यामुळे लस घेऊनही कोरोना झाला किंवा लस लागू पडली नाही, असे म्हणणे चुकीचे होईल, असे डॉ.नीता पाडळकर यांनी म्हंटले आहे.
प्रशासनाकडून आरोग्य केंद्र सील
कोरोना लस घेतलेला वैद्यकीय अधिकारी कोरोनाबाधित झाल्यानं चंदनखेडा प्राथमिक आरोग्य केंद्र सील करण्यात आले आहे. प्रशासनाकडून वैद्यकीय अधिकाऱ्याच्या संपर्कात असलेल्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. संबंधित डॉक्टरनं लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोरोना लस घेतली होती.
महत्त्वाच्या बातम्या
सरकारने रायगडावर केलेल्या ’त्या’ गोष्टीवरून संभाजीराजे भडकले; म्हणाले हा तर काळा दिवस..
आरोपी महिलेने न्यायाधीशासोबतच बांधली लगीनगाठ, पाच दिवसांनी पुन्हा जावं लागणार तुरूंगात
‘उभ्या पिकाला आग लावू, ४० लाख ट्रॅक्टर घेऊन दिल्लीत येऊ’