रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच शरद पवारांनी तिजोरी उघडली; सीएम फंडाला दिले दोन कोटी

मुंबई | कोरोनाने राज्यात भीषण परिस्थीती निर्माण झाली आहे. कोरोना रुग्णांना लस, ऑक्सिजन, बेड यांचा मोठा तुटवडा जाणवू लागला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे.

कोरोनामुळे देशावर मोठं संकट उभं राहिलं आहे. भारताच्या मदतीला अनेक देश पुढे सरसावले आहेत. खेळाडू, अभिनेते, मंत्री, उद्योजक आपल्या परीने देशाच्या मदतीसाठी हातभार लावत आहेत. राज्यातही अनेकांनी सीएम फंडात निधी दिला आहे.

अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाला मुख्यमंत्री सहायता फंडात निधी देण्याचे आदेश दिले होते. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच त्यांनी पक्षाला आदेश दिला होता. यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सीएम फंडात दोन कोटी निधी दिल्याचं जाहीर केलं आहे.

राज्यावरील लसीकरणाचा भार कमी करण्यासाठी राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या वतीने एक कोटी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार खासदारांचे महिन्याचे वेतन एक कोटी असे दोन कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यात आले. असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले आहेत.

राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांच्या उपचारासाठी मदत व्हावी यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मदत करावी असं आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलं होतं. अनेक संस्था, उद्योजक मुख्यमंत्री सहायता निधीत रक्कम जमा करण्यासाठी पुढं येत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
बाळासाहेब ठाकरे नाराज असत तेव्हा खोलीत एकाच माणसाला प्रवेश असे, ते म्हणजे दादा कोंडके
“महायुतीत असताना बाळासाहेब भाजपसाठी हिंदूहृदयसम्राट होते आणि आता…”
जिल्हाधिकारी नाही देवदुत! ना बेडची कमी ना ऑक्सिजनची; नंदूरबारच्या कलेक्टरने करून दाखवलं

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.