धक्कादायक! ऑक्सिजन बेड मिळत नसल्याने सिलेंडर घेऊन कोरोना रुग्णाचा महापालिकेसमोर ठिय्या    

मुंबई : राज्यात कोरोनाची दुसरी लाट येऊन धडकली असून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशावेळी आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचं चित्र पुन्हा पुन्हा समोर येत आहे. असाच एक धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये घडला आहे.

कोरोना बाधित गंभीर रुग्णांना शहरात ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर उपलब्ध होत नसल्याची तक्रार आहे. मात्र सिडकोतील अशाच एका रुग्णाला ऑक्सिजन कमी होऊनही वेळ मिळत नसल्याने या कोरोना रुग्णांनी महापालिकेसमोर ठिय्या दिला आहे. त्यामुळे महापालिका परिसरात खळबळ उडाली.

जाणून घ्या संपूर्ण प्रकरण…
सिडकोतील या रुग्णाचा पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल तीन दिवसांपूर्वी आला आहे. मात्र प्रकृती गंभीर असूनही खाजगी रुग्णालयात बेड शिल्लक नसल्याचे सांगितले जात आहे. त्यातच त्याची ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्याचे त्याच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नसल्याने त्यांनी येथील सामाजिक कार्यकर्ते दीपक डोके यांच्याकडे हा प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी ही विविध रुग्णालयांमध्ये संपर्क साधला. मात्र ऑक्सिजन उपलब्ध होत नसल्याने अखेरीस ऑक्सिजन सिलेंडरसह हे दोन्ही रुग्ण महापालिकेसमोर आंदोलनाला बसले.

महत्त्वाच्या बातम्या 

युपी बिहार लुटण्याच्या चक्करमध्ये कोर्टात पोहोचले होते शिल्पा शेट्टी आणि गोविंदा

“सचिन वाझे हे थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना रिपोर्टिंग करायचे, तसेच ते आदित्य ठाकरेंसोबत ऑनकॉल होते”

भारतनानांना शांती मिळवून द्यायची असेल तर त्यांच्या पुत्राविरोधात मतदान करा; पडळकरांचे अजब तर्कट

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.