बीड | दोन वर्गमित्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकले आहेत. श्रीकांत गायकवाड आणि नारायण मिसाळ अशी अटक केलेल्या दोघांची नाव आहेत. श्रीकांत गायकवाड हे बीडच्या माजलगावचे उपजिल्हाधिकारी म्हणून काम बघत होते. तर नारायण मिसाळ हे पोटोदा पंचायत समितीत गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत होते.
बीडच्या माजलगावचे उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड यांना ६५ हजारांची लाच घेताना अटक करण्यात आले आहे. माजलगावच्या शासकीय विश्रामगृहात त्यांच्या वाहनचालकामार्फत त्यांना ही रक्कम स्वीकारली आहे. त्यानंतर एसीबीने त्यांच्यावर कारवाई केली आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे श्रीकांत गायकवाड यांचे वर्गमित्र असलेले गटविकास अधिकारी नारायण मिसाळ यांना एकदिवसापुर्वीच एसीबीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली होती. यानंतर वर्गमित्र मिसाळ यांची श्रीकांत गायकवाड यांनी भेट घेतली होती.
धक्कादायक बाब म्हणजे एसीबीच्या कार्यालयात जाऊन पकडलेल्या वर्गमित्राची भेट गायकवाड यांनी घेतली. त्यानंतर श्रीकांत गायकवाड तेथून थेट माजलगावला आले आणि आपल्या चालकाच्या मार्फत लाच स्वीकारली. यादरम्यान एसीबीच्या अधिकाऱ्यांनी गायकवाड यांनाही अटक केली आहे.
दोन मोठे प्रशासकीय अधिकरी लाच घेताना एसीबीच्या गळाला लागले आहेत. सलग दोन दिवस झालेल्या या कारवाईमुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांमध्ये भीतेचे वातावरण पसरले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
शेवटी पोटाचा प्रश्न! शिपाई पदाच्या १३ जागांसाठी २७ हजार अर्ज, वाचा बेरोजगारीची भीषणता
पेट्रोलच्या वाढत्या दरापासून आता होईल सुटका, भारतात लॉन्च झाली इलेक्ट्रिक सायकल
आजकाल कुठे गायब आहे ‘जोश’ चित्रपटातील ‘हा’ अभिनेता; वाचा त्याचा खडतर प्रवास
सौरभ गांगुलीच्या पत्नीने दिली पोलीसांत तक्रार; पुर्ण प्रकरण जाणून घ्या