सर्पदंशाने दोन भावांचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या बलरामपूर येथे ही घटना घडली. विशेष म्हणजे सर्पदंशाने मृत्यू झालेल्या भावाच्या अंत्यविधीसाठी गेलेल्या तरुणाचा सापाने दंश केल्याने त्याचादेखील मृत्यू झाला. मृत व्यक्ती झोपेत असताना त्याला सापाने दंश केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलीस अधिकारी राधे रामन सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, २ ऑगस्ट रोजी ३८ वर्षीय अरविंद मिश्रा यांना साप चावल्याने त्यांचा मृत्यू झाला. अरविंद मिश्रा यांच्या अंत्यविधीसाठी त्यांचा भाऊ गोविंद मिश्रा गावाला आला होता. त्यालादेखील सापाने दंश केला व त्याचा मृत्यू झाला.
भावाच्या अंत्यविधीसाठी आलेला गोविंद मिश्रा व त्याचे एक नातेवाईक चंद्रकांत पांडे घरी झोपले होते. गोविंद झोपेत असताना त्याला साप चावला. त्याच्यासोबतच त्या नातेवाईकालाही सापाने दंश केला. गोविंदची प्रकृती खालावल्याने त्याला रुग्णालयात नेण्यात आले, तेथे गोविंद मिश्रा याचा मृत्यू झाला. गोविंद मिश्राचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून चंद्रशेखर पांडे यांची प्रकृती चिंताजनक आहे.
घटनेची माहिती मिळताच वैद्यकीय अधिकारी आणि प्रशाकीय अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच तिथले स्थानिक आमदार कैलास शुक्ला यांनी कुटुंबाची भेट घेतली आहे. यासोबतच त्यांनी मृत व्यक्तीच्या कुटुंबाला मदतीचे आश्वासनही दिले आहे. भविष्यात अशा घटना घडू नये, यासाठी सर्वांनी काळजी घेतली पाहिजे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
सापाने दंश केल्याने एकाच घरातील दोन व्यक्तींचे निधन झाल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच घरातील लोकांचे रडून रडून बेहाल झाले आहेत. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
महत्वाच्या बातम्या
Driver: स्वतः मृत्यू पत्करला पण वाचवले २५ प्रवाशांचे प्राण; एसटी चालकाची डोळ्यांत पाणी आणणारी स्टोरी
Uddhav Thackeray: आदित्य ठाकरेंची जागा घेणार तेजस ठाकरे; उद्धव ठाकरे खेळणार नवा डाव
Ranveer Singh Nude Photoshoot: रणवीर सिंह पुन्हा एकदा होणार न्युड; ‘या’ प्रसिद्ध संस्थेने केली जाहीर विनंती
मराठी लोकं साऊथचे सिनेमे पाहायला सिनेमागृहात जातात पण मराठी चित्रपट का पाहत नाहीत? महेश मांजरेकरांचा सवाल