देशात कोरोनाचा हाहाकार! एकाच दिवसात भाजप आणि काँग्रेसच्या ३ आमदारांचा मृत्यू

देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे देशभराची चिंता वाढली आहे. अनेकांना वेळेत उपचार मिळत नाही, त्यामुळे रुग्णांच्या मृत्युचे प्रमाणही वाढले आहे.

असे असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एकाच दिवसात तीन आमदारांचा मृत्यु झाला आहे. यात भाजपच्या दोन आणि काँग्रेसच्या एका महिला आमदाराचा समावेश आहे.

काही दिवसांपुर्वीच तिन्ही आमदारांना कोरोनाची लागण झाली होती, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिघेही आमदार व्हेंटिलेटर होते. भाजप आमदार सुरेश श्रीवास्तव, भाजप आमदार रमेशचंद्र दिवाकर आणि काँग्रेस आमदार कलावती भुरीया अशी या मृत झालेल्या आमदारांची नावे आहे.

सुरेश श्रीवास्तव हे उत्तर प्रदेशातील लखनऊमधील पश्चिम विधानसभा मतदार संघाचे आमदार होते. त्यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले आहे. त्यांच्यानंतर त्यांच्या पत्नी आणि मुलालाही कोरोनाची लागण झाली आहे. श्रीवास्तव यांची पक्षाचे एकनिष्ठ नेते म्हणून ओळख होती.

रमेशचंद्र दिवाकर हे औरीयाचे जिल्ह्याचे आमदार होते. त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर मेरठच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यानंतर शुक्रवारी मेडीकल कॉलेजमध्ये त्यांचे निधन झाले आहे.

कलावती भुरीया या मध्य प्रदेशच्या जोबट विधानसभा मतदार संघातील आमदार होत्या. त्यांच्यावर इंदूरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान, त्यांचाही मृत्यु झाला आहे. कलावती भुरीया यांना १० दिवसांपासून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

दरम्यान, देशात झपाट्याने रुग्णसंख्यामध्ये वाढ होत आहे. शनिवारी कोरोनाचे ३ लाख ४६ हजार ७८६ कोरोना रुग्ण सापडले आहे. एका दिवसातील ही सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. तर २६२४ लोकांचा मृत्यु झाला आहे.

महत्वाच्या बातम्या-

धक्कादायक! अवघ्या ३३ व्या वर्षी भारताच्या वेगवान गोलंदाचा मृत्यू
गुरमीत चौधरी आणि डेबिनाचे घर आहे खुपच आलिशान आणि सुंदर; पहा फोटो
लोकांचा जीव वाचवायचाय, म्हणत शिवसेना आमदाराने रेमडेसिवीरसाठी तोडली ९० लाखांची एफडी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.