मराठी सिनेमासृष्टीवर कोरोनाचा वार; ‘या’ दोन प्रसिद्ध अभिनेत्यांचे निधन

कोरोनाने देशभरात जू हाहाकार माजवला आहे. कोरोनाची ही दुसरी लाट जनतेसाठी अतिशय विध्वंसक ठरत आहे. कोणताच क्षेत्र या विळख्यातून निसटलेल नाही. रोज लोखो लोक कोरोनाची शिकार झालेली पाहायला मिळतात. आणि शेकडोने लोक मरण पावतात.

नुकत्याच हाती आलेल्या माहितीवरून पुन्हा एकदा मराठी सिनेमासृष्टीवर शोककळा पसरली आहे. मुळशी पॅटर्नआणि फत्तेशिकस्त ह्या दोन सिनेमांविषयी नव्याने सांगायची गरज नाही.या दोन्ही सिनेमांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. या दोन्ही चित्रपटात काम करणाऱ्या दोन वेगवेगळ्या कलाकारांचे कोरोनाने निधन झाले आहे.

‘फत्तेशिकस्त’ आणि ‘फर्जंद’ मराठी चित्रपटात काम कलेले आणि मराठी माणसाच्या मनावर राज्य करणारे अभिनेत नवनाथ गायकवाड याचं कोरोनाने निधन झाले आहे.  रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांचा मृ’त्यू झाला. फत्तेशिकस्त’चे लेखक, दिग्दर्शक,अभिनेते दिग्पाल लांजेकर यांनी आपल्या सो’शल मिडीयावर नवनाथ गायकवाड ह्यांच्या निधनाची बातमी देत व नवनाथ यांचा फोटो शेअर करत एक पोस्ट लिहली आहे.

देशभरात थैमान घातलेल्या या कोरोनाने अनेकांची कुटुंब उध्वस्त केली. देशभरातल्या अनेक राज्यांत ऑक्सिजन अभावी रुग्णाचा जीव जाताना दिसतोय.   काही दिवसांपूर्वी ‘मुळशी पॅटर्न’ मधील अभिनेते अमोल धावडे याचे देखील कोरोनाने निधन झाले. अमोल धावडे हे अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचे जवळचे मित्र होते. त्यांच्या जाण्याने प्रवीण तरडे यांना मोठा धक्का बसला आहे.

‘देऊळबंद’, ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटांमध्ये अमोल धावडे यांनी अभिनय केलेला पाहायला मिळतो. तसेच प्रवीण तरडे यांचा आगामी चित्रपट ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटातदेखील त्यांची महत्वाची  भूमिका असल्याची माहिती मिळते. अशाप्रकारे मराठी माणसाच्या मनावर राज्य करणाऱ्यां कलाकारांचे निधन झाल्यामुळे सर्वत्र शोककळा पसरली.

हे ही वाचा-

शिक्षकांनी हाती घेतला समाजसेवेचा वसा; कोरोना रुग्णांसाठी उभारलं ७० ऑक्सिजन बेडचं कोविड सेंटर

निकाल मोठ्या मनाने स्विकारायला हवा पण भाजप रडीचा डाव खेळतय; ममतांच्या पराभवावर पवार संतापले

चित्रपट क्षेत्रात नसणारा अशोक सराफ व निवेदिता यांचा मुलगा नक्की करतो तरी काय? जाणून घ्या

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.