‘मुर्खांनो जरा तरी विचार करा’ म्हणत अमेरिकन अभिनेत्रीचं बॉलिवूडकरांवर टीकास्त्र

शेतकरी आंदोलनाला विदेशातून मोठा पाठिंबा मिळत आहे. अंतराष्ट्रीय पातळीवरील प्रसिद्ध चेहरे शेतकऱ्यांसाठी बोलत आहेत. नुकतेच पॉपस्टर रिहानाच्या ट्विटनंतर भारतात ट्विटवॉर रंगले आहे. यामुळे बॉलिवूड आणि हॉलिवूड असा वाद समोर आला. अशात अमेरिकन अभिनेत्री अमांडा सर्नीने बॉलिवूड कलाकारांना मुर्ख म्हटले आहे. यामुळे हा वाद आणखीच शिगेला पोहचला आहे.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात ७० दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. आंदोलनसाठी दिल्लीच्या सीमेवर लाखो शेतकरी जमले आहेत. २६ जानेवारीला शेतकरी आंदोलन चिघळल्याचे दिसून आले. यानंतर या प्रकरणी अंतराष्ट्रीय पातळीवर प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

पॉपस्टार रिहाना हिच्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनानंतर तिला भारतीय सेलिब्रिटींकडून प्रतिउत्तर देण्यात आले. अचानक भारतातील अनेक प्रसिद्ध चेहऱ्यांनी तिला सोशल मीडियावर भारतातून ट्रोल केले. परंतु रिहानाला अंतराष्ट्रीय पातळीवर इतर मिया खलिफा, पर्यावरणवादी कार्यकर्ता ग्रेटा थर्नबर्ग आणि आता अमांडा सर्नी यांनी साथ दिली.

दरम्यान, अमेरिकन अभिनेत्री अमांडाने ट्विट करत अक्षय कुमार, करण जोहर, अजय देवगण, सचिन तेंडुलकर या सेलिब्रिटींचा खरपूस समाचार घेतला आहे. अमांडा हिने सर्वांनाच सडेतोड उत्तर दिले आहे.

‘’ज्यांनी खरी प्रचार मोहिम सुरु केली आहे, त्या मुर्खांना कामावर कोणी घेतलं आहे? एक असंबंध व्यक्ती भारताचं विभाजन करण्याचं षडयंत्र करत आहे आणि त्यासाठी तिला पैसे मिळत आहेत? जरा तरी विचार करा. निदान यात थोडफार वास्तववादीपणा ठेवा’’ असं ट्विट अमांडाने केले आहे. शेतकरी आंदोलनावरुन बोलणाऱ्या देशाबाहेरच्या व्यक्तींची तीने यानिमित्ताने बाजू मांडली आहे.

महत्वाच्या बातम्या-
सचिन तेंडुलकर, विराट कोहली मोदी सरकारच्या समर्थनार्थ मैदानात
कंगना पुन्हा बरळली; भारतीय क्रिकेटर्संना म्हणाली धोबी का कुत्ता
रिहानाचा आणि ख्रिस गेलचा ड्रेसिंग रूममधील व्हिडीओ झाला व्हायरल, पहा व्हिडीओ
मालिकेत भोळी दिसणारी ‘अंगूरी भाभी’ खऱ्या आयुष्यात आहे खूपच हॉट आणि ग्लॅमरस, पाहा फोटो

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.