Palghar : काल देशभरात ठिकठिकाणी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. मात्र, पालघर जिल्ह्यात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. वेळीच आरोग्य सेवा न मिळाल्यामुळे जुळ्या मुलांचा मृत्यू झाल्याची घटना अतिदुर्गम बोटोशी ग्रामपंचायतीमध्ये घडली.
मोखाडा येथील अतिदुर्गम असलेल्या बोटोशी गावातील मर्कटवाडी येथील वंदना बुधर नावाची महिला सात महिन्यांची गर्भवती होती. या महिलेला आरोग्य सेवा मिळवण्यासाठी झोळीतून तीन किलोमीटर दूर दवाखान्यात जावे लागले. मात्र, वेळीच सुविधा न मिळाल्याने तिच्या डोळ्यादेखत जुळ्या बालकांचा मृत्यू झाला.
वंदना बुधर या महिलेला अचानक प्रसूतीच्या कळा येऊ लागल्या व तिने जुळ्या बालकांना जन्म दिला. मात्र, तिला वेळेत आरोग्य सेवा मिळाली नाही. त्यामुळे उपचाराअभावी त्या दोन्ही बालकांनी प्राण सोडला.
त्यानंतर महिलेची प्रकृती खालावत होती. त्यामुळे गावकऱ्यांनी तिला झोळी करून डोंगर दऱ्या कपारीतून थेट ३ किमी अंतर पार करत खोडाळा उपकेंद्रात दाखल केले. येथे तिच्यावर उपचार सुरू आहेत.
गेली वर्षानुवर्षे येथील स्थानिक लोक, रुग्ण, गर्भवती महिला कापडी झोळीतुनच पायपीट करत रुग्णालयात जात असतात. वंदना बुधवार यांनादेखील असेच नेण्यात आले होते. परंतु वेळीच रुग्णालयात न पोहोचल्यामुळे त्यांच्या बाळांचा मृत्यू झाला.
यावेळी, नवनिर्वाचित जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी या गावाची पाहणी केली होती, त्यांनी या गावात तातडीने रस्ता मंजूर करण्याचे आदेश दिले आहेत. एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना दुसरीकडे अतिदुर्गम भागात रस्ते, आरोग्य, शिक्षण या मूलभूत सुविधांच्या अभावामुळे लोकांना जीव गमवावा लागत आहे.
महत्वाच्या बातम्या
Kaushik lm : चित्रपटसृष्टीवर शोककळा! विजय देवरकोंडा, धनुष, सलमानने जवळचा मित्र गमावला
Movies: तो चित्रपट ज्याने बंगाल दंगलींची करून दिली होती आठवण, पण ‘या’ कारणामुळे झाला बॅन
Nitish Kumar: अमित शहांचा ‘तो’ शेवटचा फोन आणि नितीश कुमारांची अट, नंतर ९ दिवसात झाला राजकीय भूकंप
मोदींच्या भाषणामुळे विरोधकांनी फडणवीसांनाच धरलं धारेवर, राजीनामा द्यावा लागणार?