जन्मापासूनच एकमेकांसोबत असणारे जुळे भाऊ, त्यांचा मृत्यूदेखील सोबतच झाला. ही दुर्दैवी अशी घटना राजस्थान येथे घडली आहे. या दोघेही जुळ्या भावांचा मृत्यू एकाचप्रकारे झाला आहे.एकमेकांपासून दूर राहूनही एकाच वेळी सारख्याच प्रकारे त्यांचा मृत्यू झाला आहे.
९०० किमी दूर असूनही सारख्याच प्रकारे मृत्यू ओढवला. नात्यात अंतर महत्वाचे नसते, हेच काय ते या दुर्दैवी घटनेसाठी म्हणावे लागेल. मृत्यूसमयी एक भाऊ गुजरातमध्ये तर एक भाऊ जयपूरमध्ये होता. गुजरातमध्ये असतांना एका भावाचा मृत्यू झाला तर त्याच वेळी जयपूरमध्ये असलेल्या दुसऱ्या भावाला मृत्यूला सामोरे जावे लागले.
दोघांचाही अंत सारख्याच प्रकारे झाल्याची वार्ता ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला आहे. या जुळ्या भावांची नावे सुमेर सिंह आणि सोहन सिंह असे होते. सुमेर सिंहचा मृत्यू हा गुजरातमध्ये असतांना झाला तर सोहन सिंहचा जयपूरला. सुमेर सिंह हा गुजरातमध्ये एका टेक्सटाईल कंपनीत कामाला होता तर जयपूरमध्ये सोहन सिंह हा सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत होता. शिक्षक भरती प्रक्रियेसाठी त्याचे प्रयत्न सुरू होते, असे समजले आहे. दोघांचा मृत्यू एकाच पद्धतीने झाला असून ते २५ वर्षांचे होते.
बुधवारी सुमेर सिंहचा गुजरातमध्ये मृत्यू झाला. छतावर पडून सुरतमध्ये त्याचा मृत्यू झाला. त्यावेळी तो फोनवर बोलत होता. तर एकीकडे ही बातमी ऐकून घरी आलेला सोहन पाय घसरून पाण्याच्या टाकीत पडल्यामुळे त्याचाही मृत्यू झाला. अशी माहिती पोलीसांनी दिली आहे.
बुधवारी सुमेर सिंहचा गुजरातमध्ये मृत्यू झाला. छतावर पडून सुरतमध्ये त्याचा मृत्यू झाला. त्यावेळी तो फोनवर बोलत होता. तर एकीकडे ही बातमी ऐकून घरी आलेला सोहन पाय घसरून पाण्याच्या टाकीत पडल्यामुळे त्याचाही मृत्यू झाला. अशी माहिती पोलीसांनी दिली आहे.
घरापासून १००मी दूर असलेल्या टाकीतून पाणी काढण्यासाठी तो गेला होता. मात्र तो परतलाच नाही. कुटुंबीयांनी तपास केल्यावर तो पाण्याच्या टाकीत बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याला रुग्णालयात नेल्यावर तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अतिशय अशा दुःखद घटनेने सर्वत्र शोक पसरला आहे.
महत्वाच्या बातम्या
tanaji sawant : आरोग्यमंत्र्यांना ‘ओमिक्रॉन’ नावंही घेता येईना; सर्वांसमोर डोकं खाजवत म्हणाले…
फक्त १० हजार देऊन पत्राचे शेड भाड्याने घेतले अन् कमावले तब्बल ४०० कोटी, कारनामा बघून पोलिसही हादरले
शिर्डीला जाण्यासाठी पत्नीने केला हट्ट, त्याने सुट्टीही घेतली, पण काळाने घातला घाला अन् अख्ख कुटुंबच संपल