टीव्ही क्षेत्रात एक अशी प्रसिद्ध मुस्लिम अभिनेत्री; जिने कधीच बिकिनी किंवा तोकडे कपडे घालून अभिनय केला नाही

छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध अभिनेत्री आणि जिजाजी छत पर है या मालिकेतील हीबा नवाबला तिच्या अभिनयासाठी ओळखले जाते. तिने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनातं एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे.

हीबा नवाब सोशल मीडियावर पण सक्रिय असते. ती फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या संपर्कात राहत असते. हिबा तिच्या अभिनयासोबतच तिच्या साधेपणासाठी पण खासकरून ओळखली जाते.

हिबा मनोरंजक विश्वाचा भाग असून पण तिने कधी तोकडे कपडे घातलेले पाहायला मिळाले नाही. तिने तिच्या अभिनयाने मनोरंजन विश्वात एक वेगळे स्थान निर्माण केले. ती कधीही हॉट आणि बोल्ड कपड्यांमध्ये दिसली नाही.

तिने पुढे म्हटले आहे की, तिने कधीही तोकडे कपडे न घालण्याचा घेतलेला निर्णय योग्यच होता. अलीकडेच तिने एक मुलाखत दिली. त्यात तिने म्हटले आहे की ती मुस्लिम कुटुंबातून येते.

ती म्हणते की मी आधीच संस्कृतीला खूप विरोध करत असते आणि आता मी अजून विरोध करू इच्छित नाही. अजूनही ती ज्या प्रकारे कपडे घालते ते तिच्या कुटुंबाला मान्य नाही. तिने वेगळ्या प्रकारे कपडे घालावेत अशी तिच्या घरच्यांची इच्छा आहे.

हिबा नवाब पुढे म्हणते की, तिला वेबसिरीजमध्ये काम करायचे आहे. पण ती धाडसी दृश्यांमुळे तिने काही काळ थांबून घेण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. माझे कुटुंब मला सांभाळण्यास समर्थ असून बिकिनी आणि तोकड्या कपड्यांमध्ये तिला भूमिका करायची नसल्याची तिने यावेळी म्हटले आहे.

ताज्या बातम्या
…म्हणून मीनाषी शेषाद्रीने ‘दामिनी’ चित्रपटानंतर एकही चित्रपट साईन केला नाही

सरपंच असावा तर असा! सर्वात तरुण सरपंचाच्या गावातून कोरोना गायब, ‘असे’ केले काम…

कोरोनाची दुसरी लाट हाताळण्यात उद्धव ठाकरे नंबर वन! जाणून घ्या कोणाचा कितवा नंबर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.