“माझी तुझी रेशीमगाठ” मालिकेतील चिमुकलीच्या भन्नाट डान्सने घातला धुमाकूळ? पाहा व्हिडीओ

माझी तुझी रेशीमगाठ ही नवीन मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. या मालिकेत प्रार्थना बेहरे आणि श्रेयस तळपदे हे मुख्य भूमिकेत दिसत आहे. मालिकेचा प्रोमो रिलीज झाल्यापासूनच मालिकेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. कारण प्रार्थना आणि श्रेयस यांच्या सोबतच एक चिमुकली देखील या मालिकेत काम करत आहे.

मालिकेत चिमुकलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. लहान मुलांची निरागसता, प्रेमळ स्वभाव, अनेकांच्या मनावर जादू करतात. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील चिमुकलीचे नाव मायरा वायकुळ असं आहे.

मायरा ही ४ वर्षांची आहे. ती अभिनयात उत्तम, डान्समध्ये उत्कृष्ट तसेच सोशल मीडियावर सुपर ऍक्टिव्ह आहे. इंस्टाग्रामवर मायराचे ९० हजाराहून अधिक फॉलोवर्स आहेत. तसेच तिचे युट्युबवर mayra’s corner या नावाने तीच युट्युब चॅनेल देखील आहे.

मायरा वायकुळने टिकटॉकच्या माध्यमातुन तसेच इंस्टाग्रामच्या माध्यमातून प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील अभिनेत्री प्रार्थना बेहरे असो वा श्रेयस तळपदे सर्वच जण तिच्या तिच्या सोबत व्हिडिओ आणि फोटो काढायला उत्सुक असतात.

नुकतंच तिचा अशी ही बनवाबनवी या चित्रपटातील हृदयी वसंत फुलताना गाण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या डान्सला प्रेक्षकांकडून खूप प्रतिसाद मिळाला आहे. व्हिडिओमध्ये आपल्यला दिसून येते की, अभिनयाप्रमाणे देखील डान्समध्येही ती पारंगत आहे. या गाण्यावरती तिने चांगलाच ठेका धरला आहे.

डान्स करता करता चेहऱ्यावरील हाव भाव ही ती उत्कृष्ट प्रकारे करताना दिसत आहे. तुझी माझी रेशीमगाठ या घरातून मायरा अनेकांच्या घरात पोहोचली आणि सर्वांचीच आवडती झाली. या मालिकेत प्रार्थना बेहरे परीच्या आईची म्हणजेच मायराच्या आईची भूमिका साकारताना दिसत आहे. झी मराठी हा मोठा प्लॅटफॉर्म मायराला मिळाला आणि त्याने तीच सोनं करून दाखवलं म्हणायला हरकत नाही.

 

महत्वाच्या बातम्या
कर्नाटकातील भाजप सरकारने प्राचीन मंदीरावर फिरवला बुलडोझर; मंदीर उद्धवस्त
त्यावेळी मला मरावंस वाटत होतं; दिपीकाने सांगीतला ‘तो’ भयानक किस्सा; अशी वेळ कुणावरही येऊ नये…

मोदी शहांचे पुन्हा धक्कातंत्र! भूपेंद्र पटेल गुजरातचे नवे मुख्यमंत्री; जाणून घ्या कोण आहेत भूपेंद्र पटेल
मानलं बुवा! इस्त्रायलमधील कैद्यांचा आगळावेगळा प्रताप; चमचाने बोगदा खाणुन तुरूंगातून काढला पळ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.