पाठकबाईंची नऊवारीवरची आगळीच अदा,फोटो पाहून नेटकरी म्हणतात आम्ही होतो ‘राणा’दा…

अभिनेत्री अक्षया देवधर ही “तुझात जीव रंगला” या छोट्या पडद्यावरील मालिकेतून घराघरात पोहोचली होती. तिच्या सुंदर आणि सहज अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली.

या मालिकेत तिने अंजलीबाईची भूमिका साकारली होती. अभिनेत्री अक्षया देवधर ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती अनेक फोटो शेअर करत असते. वेस्टर्न असो किंवा ट्रेडिशनल प्रत्येक लूकमध्ये अक्षया फारच सुंदर दिसते. तिच्या मनमोहक अदा चाहत्यांना आकर्षित करून घेतात.

नेहमी प्रमाणेच तिने आताही सोशल मीडियावर तिचे फोटोज शेअर केले आहे. या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अक्षयाने नुकताच नऊवारी साडीवर फोटोशूट केलं आहे.

या फोटोमध्ये तिने ट्रेडिशनल लुकचा फोटोशूट केला असून इंस्टाग्रामवर तिचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये अक्षयाने निळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहे. नाकात नथ, कपाळावर चंद्रकोर केसात गजरा घालून यावर तिने पारंपरिक दागिने घातले आहेत.

या सर्व साजशृंगाराने अक्षयाचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे. तिच्या नुकत्याच व्हायरल होत असलेल्या फोटोशूटवरून तिच्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

तसेच अलीकडेच तिने पांढऱ्या रंगाच्या साडीमधले फोटो शेअर केले होते. हे फोटो पाहून अनेकांना भुरळ पडली होती. पाठकबाईच्या या फोटोमुळे नेटकरी घायाळ झाले होते. तिला या फोटोशूटमुळे अनेक कमेंट्स आल्या होत्या.

 

महत्वाच्या बातम्या
वृषाली आणि अतुलचा अवघ्या २१ दिवसांचा संसार नदीने तिच्या पोटात सामावून घेतला
अजबच परंपरा! आवडता जोडीदार मिळेपर्यंत तरुणी बनवू शकतात तरुणांसोबत शारीरिक संबंध; हा समाज देतो मान्यता
रात्रीत मालामाल झाला शेतकरी! बॅंक खात्यात अचानक आले ५२ कोटी; जाणून घ्या पुर्ण प्रकरण
TCS मधील लाखोंच्या पगाराची नोकरी सोडून शेती करतेय ही तरुणी, आज वर्षाला कमावतेय तब्बल २० कोटी रुपये!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.