Share

‘तुम्ही खुशाल गांधीजींचा खुनी नथुरामाला हिरो बनवता’, आता काय बोलायचं! तुषार गांधी भडकले

चित्रपट तयार झाल्यानंतर त्याबद्दल वाद निर्माण होणे हे काही नवीन नाही. बॉलिवूडमध्ये सध्या चित्रपट बनल्यानंतर वाद हे एक प्रकारचे ट्रेंडच तयार झाले आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच तो चित्रपट वेगवेगळ्या वादाच्या भोवऱ्यात सापडत असतो. गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळ्या विषयांवर आधारीत हिंदी चित्रपट येत आहेत. काश्मीर फाईल्स सारख्या चित्रपट ज्यात काश्मीरी पंडितांवर होणाऱ्या अत्याचारांबद्दल कथा मांडली होती. या चित्रपटाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

या चित्रपटानंतर आता आगामी चित्रपट गांधी गोडसे एक युद्ध यावर चर्चा होतांना दिसत आहे. राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाणारे महात्मा गांधी यांची गोळ्या घालून नथुराम गोडसेने हत्या केली होती. गांधी आणि गोडसे यांच्याबद्दल आजही अनेक चर्चा होत असतात. अशात हा चित्रपट येणार म्हटल्यावर या चित्रपटाबद्दल चर्चा तर रंगणारच.

राजकुमार संतोषी यांच्या या चित्रपटाने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या नव्या चित्रपटाने लोकांचे पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतले आहे. या विषयावर या चित्रपटापूर्वीही अनेक नाटकं, चर्चासत्र, चित्रपट यासारख्या माध्यमांनी खळबळ उडवली होतीच.

मी नथुराम गोडसे बोलतोय हे नाटक केलेले शरद पोंक्षे यांच्या या नाटकाची चर्चा होतच असते. २६ जानेवारीला गांधी गोडसे एक युद्ध हा चित्रपट पप्रदर्शित होणार आहे. राजकुमार संतोषी यांचा हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच चर्चेत आहे.

महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी या चित्रपटाबद्दल सोशल मीडियावर त्यांचे मत व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, ज्या व्यक्तीने गांधीजींची हत्या केली त्याला तुम्ही हिरो बनवत आहात, यावर आणखी काय बोलायचे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

या हल्ल्यात जर गांधीजी वाचले असते तर त्यानंतर देशाचे राजकारण समाजकारण हे सगळे चित्र कसे असते याबद्दलचा विचार या चित्रपटात केला आहे. त्यामुळे तुषार गांधीच्या प्रश्नावर प्रतिप्रश्न निर्माण होत आहेत. राजकुमार संतोषी यांनी या चित्रपटाला वेगळ्या नजरेतून निर्माण केला असल्याचे बोलले जात आहे.

महत्वाच्या बातम्या
चिन्मय मांडलेकरच्या गांधी विरूद्ध गोडसेचा वाद पेटला; आता दिग्दर्शक म्हणतात..
‘हिंदु राष्ट्रासाठी मी तमचा वध करेल’; चिन्मय मांडलेकर साकारणार गोडसेची भूमिका, येतोय नवा चित्रपट
वारसा असतानाही रितेश राजकारणात का नाही आला? अखेर रितेशने स्वतःच उघड केले खरे कारण

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now