कोण आहेत ते तुषार भोसले? अजित पवार यांनी भाजपच्या वारकरी नेत्याला सुनावले

पुणे । सध्या राज्यावर अजून देखील कोरोनाचे सावट आहे. यामुळे यंदा देखील पालखी सोहळा हा साध्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत सूचना दिल्या आहेत. यावर मात्र अनेकांनी टीका केली आहे.

वारीत खंड पडू न देता वारीला परवानगी देण्याची मागणी भाजपा आध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी केली आहे. याबाबत अजित पवार यांना सवाल करण्यात आला. तेव्हा कोण आहेत तुषार भोसले? असा सवाल करून अजितदादांनी भोसले यांना चांगलेच सुनावले आहे.

यामुळे आता राजकीय वातावरण तापल्याची शक्यता आहे. त्यामुळे तुषार भोसले हे आता चांगलेच चर्चेत आले आहेत. तुषार भोसले हे भाजपच्या आध्यात्मिक आघाडचे प्रमुख आहेत. आध्यात्मिक क्षेत्रातील ते आचार्य आहेत. त्यांना देण्यात आलेल्या आचार्य पदवीबाबतही वाद झाला होता. तेव्हापासून ते चर्चेत आले.

ते बहुजन समाजाचे नसून ब्राह्मण असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. ते जगन्नाथ महाराजांचे पट्टशिष्य म्हणून ओळखले जातात. त्यांनी मुंबईतील भारतीय विद्याभवनमधून शिक्षण घेतले आहे. वयाच्या १७व्या वर्षी अखंड ३६५ दिवस प्रवचन देण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.

आज तुषार भोसले यांनी वारीबाबत सरकारला इशारा दिल्याचे अजित पवार यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावेळी कोण आहेत तुषार भोसले? असा सवाल पवारांनी केला. त्यावर ते भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख असल्याचे सांगण्यात आले. त्यावर, कोणत्याही राजकीय व्यक्तीने काही सांगितले तर ते कितपत गांभीर्याने घ्यायचे ते वेगळे आहे.

तसेच ते म्हणाले, आम्ही सर्वांनी वारकीर संप्रदायाशी चर्चा केली आहे. कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे त्यांना निर्बंधांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे, असे पवार म्हणाले. काही पालख्यांना परवानगी देण्यात आली आहे. त्या बसमधून पंढरपूरला जाण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

तुमच्या गाडीचा अपघात झाल्यास खरंच भरपाई द्यायची असते का? जाणून घ्या नियम

दिशा वाकानी म्हणजेच दयाभाभीचं हे रूप पाहून व्हाल हैराण; बॅकलेस चोळीमध्ये केलाय धमाकेदार डान्स

ब्रेकिंग! भाजप खासदार नारायण राणे दिल्लीत, केंद्रात मंत्रीपद मिळण्याची शक्यता

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.