Share

‘या’ अभिनेत्रीचे धक्कादायक गौप्यस्फोट; तुनिषा गर्भवती होती, मोहम्मदने लग्नास नकार दिल्यामुळेच तिने…

टीव्ही अभिनेत्री तुनिषा आत्महत्या प्रकरणात मोठा अपडेट समोर आला आहे. अभिनेत्री प्रीती तनेजा हिने सांगितले की, तुनिषा गरोदर असून शीजनने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिल्याचे सांगितले आहे. 20 वर्षीय प्रतिभावान टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने 24 डिसेंबर 2022 रोजी ‘अली बाबा दास्तान-ए-काबुल’च्या सेटवर गळफास घेऊन आत्महत्या केली.

या प्रकरणी तिचा माजी प्रियकर आणि सहकलाकार शीझान मोहम्मद खान याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. आता या प्रकरणात एक नवीन अपडेट समोर आले आहे. ‘मॅडम सर’ फेम प्रीती तनेजा हिने दावा केला आहे की, तुनिषा आणि शीजान खूप जवळ होते.

तुनिषाला शीजनशी लग्न करायचे होते, पण शीजनने लग्नास स्पष्ट नकार दिला. एवढेच नाही तर प्रीतीने तुनिषा आई होणार असल्याचेही सांगितले. त्यामुळे तिला शीजनशी लग्न करायचे होते, पण शीजन वारंवार लग्नास नकार देत होता. ‘अली बाबा दास्तान-ए-काबुल’ या टीव्ही शोमध्ये एकत्र काम करत असताना तुनिषा आणि शीजान एकमेकांच्या प्रेमात पडले.

दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, रिपोर्ट्सनुसार, शीजानचे काही काळापूर्वी तुनिषासोबत ब्रेकअप झाले होते. ब्रेकअपनंतर ती डिप्रेशनमध्ये राहू लागली. 24 डिसेंबर 2022 रोजी आत्महत्या करण्यापूर्वी ती शीजनच्या मेकअप रूममध्येही गेली होती. यानंतर तिने आत्महत्या केली.

तुनिषाच्या पालकांनी शीजानवर गुन्हा दाखल केला आहे. त्याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. आज त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. तुनिशाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप अभिनेत्यावर करण्यात आला आहे. तसेच काल रात्री तुनिषाचे पोस्टमॉर्टमही जेजे हॉस्पिटलमध्ये करण्यात आले आहे. शवविच्छेदन अहवालाबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या अहवालातून अनेक गुपिते उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्वाच्या बातम्या
टीम इंडियाची फायनल निश्चीत? जाणून घ्या बांगलादेश मालिकेनंतर कसं बनलय वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे गणित
subramanyam swami : “शिंदे-फडणवीस सरकार जनतेतून आलेले नाही, फडणवीस जास्त बोलले तर ते उपमुख्यमंत्री राहणार नाही”
Sushma Andhare : “एकनाथ शिंदेंच्या गटातील २० आमदार भाजपात सामील होणार”

क्राईम ताज्या बातम्या बाॅलीवुड

Join WhatsApp

Join Now