रातोरात सुपरस्टार झालेली संदली सिंन्हा अचानक बॉलीवूडमधून गायब का झाली?

बॉलीवूडमध्ये अनेक कलाकार येतात आणि जातात काही कलाकारांना चांगले यश मिळते. तर काही कलाकारांना यश मिळत नाही. ज्यामुळे त्यांचे करिअर खराब होते आणि ते बॉलीवूडपासून लांब जातात.

अशाच एका अभिनेत्रीबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. या अभिनेत्रीचे नाव आहे संधली सिंन्हा. संदलीने बॉलीवूडमध्ये खुपच दमदार डेब्यु केला होता. ती रातोरात सुपरस्टार झाली होती. तिला खुप मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली होती.

पण तिची ही प्रसिद्धी जास्त काळ टिकू शकली नाही.
बॉलीवूडमध्ये २००१ साली ‘तुम बिन’ हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाने खुप जास्त प्रसिद्धी मिळवली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला होता.

तुम बिन चित्रपट २००१ सालचा म्यूजिकल हिट होता. या चित्रपटाने त्या काळात बॉक्स ऑफिसवर खुप जास्क कमाई केली होती. त्यामुळे या चित्रपटातील कलाकार रातोरात स्टार झाले होते. या चित्रपटातील गाणे सुद्धा तेव्हा खुप प्रसिद्ध झाले होते.

त्यामूळे या चित्रपटातील सगळे कलाकार रातोरात स्टार बनले होते. या चित्रपटातून संदली सिन्हा, प्रियांशू चटर्जी, हिमांशू मलिक आणि राकेश वशिष्ठ या अभिनेत्यांनी बॉलीवूडमध्ये प्रदार्पण केले होते. हे सर्वजण रातोरात स्टार झाले होते.

पण या सर्वांचे करिअर जास्त काळ टिकले नाही. या चित्रपटातून संदली सिन्हाने बॉलीवूडमध्ये प्रदार्पण केले होते. संदली सिन्हा या चित्रपटानंतर खुप जास्त प्रसिद्ध झाली होती. तिने तिच्या सुंदरतेने अनेकांची मने जिंकली होती.

असे बोलले जात होते की, संदली बॉलीवूडची नेक्स्ट सुपरस्टार होऊ शकते. पण संदलीला हे यश टिकवता आले नाही. ती खुप कमी वेळात बॉलीवूडमधून गायब झाली. कारण संदलीने चित्रपटांची निवड करताना चुक केली.

पहील्या चित्रपटात यशस्वी झालेली संदली अचानक बॉलीवूडमधून गायब झाली. तिने साऊथ चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली होती. पण साऊथमध्ये देखील तिला खास यश मिळाले नाही. शेवटी तिने लग्न करण्याचा निर्णय घेतला.

लोकांनी तिला स्टार बनवले होते. सध्या संदली चित्रपटांमध्ये दिसत नाही. तुम बिन चित्रपटानंतर संदलीला अनेक चित्रपटांच्या ऑफर आल्या होत्या. तिने अनेक चित्रपट देखील साईन केले होते. पण तिला काही खास यश मिळाले नाही.

असे बोलले जाते संदलीने चित्रपटांची निवड चुकीची केली होती. संदली पिंजर आणि अब तुम्हारे हवाले वतन साथियो या चित्रपटांमध्ये ती दिसली. पण या चित्रपटांनंतर देखील तिला हव तस यश मिळाले नाही. त्यानंतर ती चित्रपटांमध्ये साईड रोल निभावताना दिसू लागली.

त्यामूळे प्रेक्षकांनी तिच्या चित्रपटांना नापसंत केले. २००५ मध्ये संदली सिन्हाने बिझनेस मॅन किरण सालस्करसोबत लग्न केले. लग्नानंतर तिने तिच्या पतीसोबत बिझनेस सांभाळायला सुरुवात केली. हिच तिची सर्वात मोठी चुक ठरली. लग्नानंतर ती अभिनयापासून लांब गेली.

संदली भारतातील सर्वात मोठी बेकरी ब्रँड ‘कंट्री ऑफ ओरिजन’ची फाऊंडर आहे. तिने बिझनेसमध्ये या कालावधीमध्ये खुप नाव कमावले आहे.
लग्नाच्या काही वर्षांनंतर संदलीने चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली.

यावेळेस ती साऊथ चित्रपटांमध्ये काम केले. पण साऊथमध्ये देखील तिला हवे तसे यश मिळाले नाही. संदली दोन मुलांची आई आहे. संदलीने तिचे करिअर सांभाळण्याचे अनेक प्रयत्न केले होते. पण त्यात तिला यश मिळाले नाही.

महत्त्वाच्या बातम्या –

३० वर्ष बॉलीवूडमध्ये असूनही गोविंदासोबत ‘असे’ वागतात बॉलीवूडचे कलाकार

…म्हणून अलका कुबलने आपल्या दोन्ही मुलींना चित्रपटसृष्टीपासून लांब ठेवलेय

…म्हणून ऐश्वर्या राय नेहमी आराध्याचा हात पकडून असते

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.