Tukaram Mundhe : आरोग्य सेवा आयुक्त तुकाराम मुंढे हे औरंगाबाद दौरा करणार असल्याची माहिती मिळताच आरोग्य विभागातील सर्व लोक सतर्क झालेत. तुकाराम मुंढे यांना शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जाते. त्यामुळे त्यांच्या येण्याच्या बातमीने सर्वांनाच धडकी भरली.
काही दिवसांपूर्वीच तुकाराम मुंढे यांनी आरोग्य सेवा आयुक्त या पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी आपला दौरा सुरू केला. २० आणि २१ तारखेला ते औरंगाबाद येथे भेट देणार असल्याची माहिती आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मिळाली.
त्यानंतर त्या सर्वांचा एकच गोंधळ उडाला. त्यांच्या येण्याची माहिती मिळताच नेत्र विभागातील सर्व कर्मचारी कामाला लागले. प्रत्येक विभागातील अधिकारी आणि कर्मचारी हे व्यवस्थित आपापले काम पाहतील याकडे लक्ष दिले गेले. परंतु, सायंकाळपर्यंत तुकाराम मुंढे आले नाहीत.
गुरुवारी तुकाराम मुंढे औरंगाबाद येथे पोहोचले नाहीत. त्यानंतर ते शुक्रवारी येणार असे समजून त्या दिवशीही सर्वांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले. सर्व विभागातील कर्मचारी वेळेत उपस्थित असतील यावर अधिक लक्ष देण्यात आले. सगळीकडे तुकाराम मुंढे कुठपर्यंत आले? हा एकच प्रश्न विचारला जात होता.
तुकाराम मुंढे हे स्वतः अतिशय शिस्तप्रिय असून आपल्या कर्मचाऱ्यांनीही शिस्तप्रिय राहावे याला ते अधिक प्राधान्य देतात. त्यामुळे ते ज्या भागात काम करत असतील तेथील त्यांचे कर्मचारी हे नेहमीच त्यांच्या धाकात असल्याचे बोलले जाते. त्यांचे शिस्तप्रियतेचे अनेक किस्से प्रचलित आहेत.
शिस्त न पाळल्यामुळे तुकाराम मुंढे यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे आता त्यांचा औरंगाबाद दौरा असल्याचे समजताच सर्व आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या. आपल्याकडून कोणतीही चूक होऊ नये, याकडे सर्वांनी लक्ष केंद्रित केले.
महत्त्वाच्या बातम्या-
इंडियन आयडॉल : गाणे कसेही गायले तरी कौतुक करा! भारतीय आयडाॅल आयोजकांनी दिली होती ताकीद
संजय दत्त : जेव्हा संजय दत्ताच्या घटे एके-५६ रायफलच्या घडल्या तेव्हा काय होते? वाचा इनसाईड स्टोरी भास्कर
जाधव : वर तुटून पडणारे भास्कर जाधव चिपळात येवत बोलता रडायला लागले.