तुकाराम मुंढे तुम्ही आयुक्त म्हणून पाहीजे होतात; कालच्या दुर्घटनेनंतर नाशिककरांची आर्तहाक

राज्यभरात कोरोनाच्या संकटाने थैमान घातले आहे. असे असताना नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. नाशिकमधील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाकीच्या पाईप लाईनला बुधवारी गळती लागली होती. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली होती.

विशेष म्हणजे या रुग्णालयात १२० पेक्षा जास्त रुग्ण व्हेंटिलेटरवर आणि ऑक्सिजनवर होते. या दुर्घटनेत आतापर्यंत २२ रुग्णांचा मृत्यु झाला असून हा आकडा अधिक वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

आता या घटनेवर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहे. अशात नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळणाऱ्या तुकाराम मुंढे यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.

नाशिकमधील घटना अत्यंत मन हेलावून टाकणारी आहे. या दुर्दैवी आणि वेदणादायी घटनेने मन सुन्न झाले असून मी निशब्द झालो आहे. मृतांना भावपुर्ण श्रद्धांजली, अशी फेसबूक पोस्ट तुकाराम मुंढे यांनी केली आहे.

आता तुकाराम मुंढे यांच्या फेसबुक पोस्टवर नाशिकरांनी प्रतिक्रिया दिल्या आहे. अशा संकट काळात नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे हवे होते, अशा प्रतिक्रिया नाशिककरांनी दिल्या आहे.

अशा संकटकाळी तुम्ही आयुक्त हवे होते, एकवेळ थोडी घरपट्टी जास्त भरुन टाकली असती. पण तुमच्या नेतृत्वात उत्कृष्ट प्रशासनाचा अनुभव नाशिकरांनी घेतला असता, असे एका फेसबुक युजर्सने म्हटले आहे.

तसेच सर आज खरोखर नाशिककरांना तुमची आठवण येईल. कामचुकार कर्मचारी या संपुर्ण घटनेला जबाबदार आहे. राजकारण्यांनी आपल्या स्वार्थासाठी बदली केली होती, अशीही प्रतिक्रीया एका नाशिककराने दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-

राजेश टोपेंची मोदींना कळकळीची विनंती; आम्ही पाया पडायला तयार, पण ऑक्सिजन उपलब्ध करा
कोरोनाच्या संकटात देशाच्या मदतीसाठी भारतीय हवाई दलाचे उड्डाण; औषधे, वैद्यकीय कर्मचारी एअरलिफ्ट
‘बॉबी’ चित्रपटासाठी ऋषी कपूरला अवॉर्ड भेटला नव्हता तर त्यांनी तो खरेदी केला होता

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.