मानसिकता बदलण्याचा केला प्रयत्न पण झाले भलतेच, ‘या’ अभिनेत्री ब्रेस्टफिडिंगच्या फोटोंमुळे झाल्या ट्रोल

मुंबई। मुल जन्माला आलं की त्याच्या जन्मानंतर जवळजवळ ५ ते ६ महिने आईच्या अंगावरील दूध मुलांना पाजावे लागते. त्यामुळे मुलांना दुध पाजण्यासाठी वेळात वेळ काढून एका शांत ठिकाणी आई बसून आपल्या मुलाला आडोसा घेऊन दूध पाजत असते. मात्र बहुतेकदा महिला सार्वजनिक ठिकाणी मुलांना दूध पाजण्यासाठी लाजत असतात.

कारण आजूबाजूला माणसं असल्याने त्यांना सर्वांसमोर दूध पाजणे किंवा पुरुषांना एका महिलेला बाळाला दूध पाजताना बघितल्यावर अश्लिल वाटते. म्हणूच पुरुषांची असो किंवा समाजाची असो त्यांची मानसिकता बदलण्यासाठी काही अभिनेत्रींनी आपल्या बाळाला स्तनपान करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

मात्र हेच फोटो सोशल मीडियावर ट्रॉलर्सकडून ट्रोल करण्यात आल्याचे पाहिले आहेत. अभिनेत्रींचा स्तनपान करतानाच व्हिडिओ किंवा फोटो सोशल मीडियावर शेअर करण्याचा उद्देश दुसरा तिसरा काहीही नसून सार्वजनिक ठिकाणी स्तनपान करणं पुरूषांना अश्लिल वाटत व त्यांच्या या मानसिकतेला बदलण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्रींनी प्रयत्न केला.

मात्र त्या अभिनेत्रींना लोकांच्या या मानसिकतेचा सामना करावा लागला आहे. आतापर्यंत कोणकोणत्या अभिनेत्रींनी स्तनपान करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत पाहुयात.

आपल्या बिनधास्त आणि बॉलीवूड मधील यशस्वी स्त्री म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री नेहा धुपिया. नेहा धुपियाची मुलगी मेहरला प्रत्येत जण क्यूट आणि निरागस मानतात. पण जेव्हा नेहाने ब्रेस्टफीडिंग करताना सोशल मीडियावर फोटो शेअर केला तेव्हा तिला तुफान ट्रोल करण्यात आलं.

 

अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारलेली अभिनेत्री आणि मॉडेल लिजा डे कायम तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. पण जेव्हा लिजाने ब्रेस्टफीडिंग करताना सोशल मीडियावर फोटो शेअर केला तेव्हा तिला तुफान ट्रोल करण्यात आलं.

2012 साली जुडवामुलांना जन्म देणारी अभिनेत्री सेलिना जेटली. आज झगमगत्या जगापासून जरी सेलिना दूर असली तरी सोशल मीडियावर ती कायम चर्चेत असते. ब्रेस्टफीडिंग करताना फोटो शेअर केला तेव्हा तिला अश्लिल म्हणण्यात आलं.

अभिनेत्री एमी जॅक्सनने देखील सोशल मीडिया सोशल मीडियावर ब्रेस्टफीडिंग करताना फोटो शेअर केला तेव्हा तिला तुफाम ट्रोल करण्यात आलं. मात्र फक्त इतक्याच अभिनेत्रींनी नाही तर आतापर्यंत अनेक स्त्रियांनी तसेच मालिकांमधील अभिनेत्रींनी आतापर्यंत असे फोटो शेअर केले आहेत. व त्यादेखील ट्रोल झाल्या आहे.
महत्वाच्या बातम्या
किस्सा आबांचा: जेव्हा आबा एसटीने प्रवास करत होते आणि कंडक्टरने विचारले तिकीट कुठाय? आबा म्हणाले…
..आणि नवरीला मंडपातच मारू लागला तिचा भाऊ, मग नवरदेवाने केली मेहुण्याची धूलाई, पहा व्हिडिओ
डायबिटीजवर प्रभावी असलेल्या बायोकॉनच्या औषधाला मंजूरी; कमी खर्चात करता येईल शुगर कमी
इंडिअन आयडल १२: अनु मलिक यांना डेडिकेट होणार ग्रैंड फिनाले थीम; जाणून घ्या काय काय घडणार….

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.