बॉलीवूडच्या सदाबाहर अभिनेत्री रेखाचे आजही लाखो चाहते आहेत. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण त्या त्यांच्या चित्रपटांपेक्षा जास्त वैयक्तिक आयूष्यामूळेच जास्त चर्चेत असतात. रेखाचे नाव अनेक अभिनेत्यांसोबत जोडले गेले होते.
त्यामूळे त्यांच्या अफेअरच्या चर्चा आजही होत असतात. रेखा त्यांच्या आयूष्यामध्ये अनेक वेळा प्रेमात पडल्या. पण त्यांना खरे प्रेम मिळाले. आजही त्या एकटे आयूष्य जगतात. रेखाने लग्न देखील केले होते. पण त्यांचे लग्न जास्त काळ टिकू शकले नाही.
फिल्म इंडस्ट्रीमध्ये अमिताभ बच्चननंतर रेखाचे सर्वात जास्त चर्चित अफेअर विनोद मेहरासोबत होते. रेखा आणि विनोद मेहराने लग्न केल्याचे बोलले जात होते. पण त्यांच्या लग्नाचे रहस्य तसेच राहिले. त्यांनी कधीही लग्नाबद्दल खुलासा केला नाही.
रेखाने त्यांच्या आयूष्यात फक्त एका लग्नाबद्दल लोकांना सर्वांना सांगितले होते. पण त्यांचे ते लग्न जास्त काळ टिकू शकले नाही. १९९० मध्ये रेखा आणि बिजनेस मॅन मुकेश अग्रवालचे लग्न झाले होते. दोघांची पहीली भेटली एका पार्टीमध्ये झाली होती. पहील्या भेटीत रेखाला मुकेश आवडले नव्हते.
पण दुसऱ्या भेटीत मात्र दोघे एकमेकांकडे आकर्षित झाले. मुकेश अग्रवाल त्याकाळचे खुप प्रसिद्ध बिजनेस मॅन होते. मुकेश रेखाचे खुप मोठे फॅन होते. एका महिन्याच्या ओळखीनंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण अवघ्या सहा महिन्यांमध्येच दोघांचे लग्न तुटले.
रेखाने याबद्दल बोलताना सांगितले होते की, ‘मुकेशचे माझ्यावर प्रेम होते. त्यासोबतच त्यांना माझ्या चेहऱ्याचा आणि प्रसिद्धीचा वापर बिजनेससाठी करायचा होता. म्हणून त्यांनी माझ्याशी लग्न केले होते. पण ही गोष्ट मला मान्य नव्हती. म्हणून मी घटस्फोट घेतला’.
घटस्फोटानंतर काही महिन्यांनी मुकेशने फार्म हाऊसमध्ये रेखाच्या ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यामूळे सर्वांना खुप मोठा धक्का बसला होता. मुकेशच्या सुसाईड नोटमध्ये अनेक गोष्टींचा खुलासा झाला होता. रेखा आणि फिल्म इंडस्ट्रीतील लोकांसाठी हा खुप मोठा धक्का होता.
सुसाईड नोटमध्ये त्यांनी त्यांच्या प्रॉपर्टीबद्दल खुलासा केला होता. करोडोंच्या संपत्तीचे मालक असणाऱ्या मुकेशने रेखासाठी प्रॉपर्टी ठेवली नाही. त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले होते की, ‘रेखा स्वत: कमवू शकते. त्यामूळे मी रेखासाठी प्रॉपर्टीमधला हिस्सा दिला नाही. माझी सगळी संपत्ती माझ्या कुटूंबासाठी आहे’.
पतीच्या मृत्यूनंतर रेखाला खुप मोठा धक्का बसला होता. असे बोलले जाते की, पतीच्या मृत्यूनंतर रेखा अनेक दिवस डिप्रेशनमध्ये होत्या. त्यांना या गोष्टीतून बाहेर येण्यासाठी खुप जास्त काळ लागला होता. पण पहील्या पतीच्या मृत्यूनंतर रेखाने दुसरे लग्न केले नाही. आजही त्या एकटे आयूष्य जगतात.
महत्वाच्या बातम्या –
हमारी अधूरी कहानी! वाचा किंग ऑफ रोमान्स यश चोप्राची अधूरी प्रेम कहानी
अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतचा दिग्दर्शक मंदार देवस्थळीवर पैसे थकवल्याचा आरोप
अभिनेत्री नेहा पेंडसेचा नवऱ्यासोबत किस करताना व्हिडिओ होतोय व्हायरल, पाहा व्हिडिओ
‘ही’ आहे जेठालालची खऱ्या आयुष्यातील पत्नी; सुंदरतेमध्ये देते मोठ्या मोठ्या अभिनेत्रींना टक्कर